Talpan: तळपणची समुद्री गस्तीबोट नादुरुस्त, किनारी सुरक्षा पोलिसांची व्यथा; नवीन बोटीची मागणी

talpan patrol boat out of service: तळपण किनारी सुरक्षा पोलिसांकडे समुद्रात गस्तीस जाण्यासाठी बोट नाही. गस्तीसाठी आणलेली बोट गेली चार वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे.
talpan patrol boat out of service
talpan patrol boat out of serviceDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: तळपण किनारी सुरक्षा पोलिसांकडे समुद्रात गस्तीस जाण्यासाठी बोट नाही. गस्तीसाठी आणलेली बोट गेली चार वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. मंगळवारी मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार सुमारे बारा तास बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी किनारी सुरक्षा पोलिसांना खासगी स्पीड बोट घेऊन जावे लागले. त्यामुळे या गस्ती बोटीचा प्रश्न पुन्हा उफाळून आला आहे.

यासंदर्भात कॉंग्रेसचे वैष्णव पेडणेकर व अन्य कार्यकर्त्यांनी सुरक्षा पोलिसांकडे निवेदन देऊन तातडीने बोटीची दुरुस्ती करावी किंवा नवीन गस्तीची बोट या पोलिस स्थानकावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

talpan patrol boat out of service
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

त्याचप्रमाणे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी या पोलिस स्थानकावर गस्तीची बोट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तळपण जेटीवर किनारी सुरक्षा पोलिस स्थानक कुचकामी ठरले अाहे.

talpan patrol boat out of service
Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

यापूर्वी मालपे-कर्नाटक येथील मोठ्या क्षमतेच्या मच्छिमारी बोटी गोव्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करत असताना त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांना खासगी बोटीचा आधार घ्यावा लागला होता, याकडेही कोमरपंत यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com