Goa Ganesh Chaturthi 2023: म्हापशातील स्वर साई घुमट आरती मंडळाची गगनभरारी

Goa Ganesh Chaturthi 2023: विविध स्‍पर्धांमध्‍ये पटकावलीय पहिल्या क्रमांकाची 200 बक्षिसे
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023Dainik Gomamtak

Goa Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी हा गोव्यातील मोठा उत्सव असून, बाप्पाविषयी असलेली श्रद्धा, आपुलकी तसेच सांस्कृतिक वेगळेपण गोमंतकीयांनी आजही जपले आहे. आणि याच वैविध्यपूर्णतेमुळे गोव्यातील चतुर्थी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते.

Goa Ganesh Chaturthi 2023
Gomantak YIN: गोमन्तक यीनतर्फे आज ‘घुमट गंध’

या काळात घरांपासून, वाड्यापर्यंत तसेच शहरापासून ते राज्यस्तरीय स्पर्धांमध्‍ये घुमट आरत्यांचा गजर कानी पडतो आणि हाच घुमटांचा वारसा म्हापसा येथील स्वर साई घुमट आरती मंडळाने मागील 18 वर्षांपासून जपला आहे.

स्वर साई घुमट आरती मंडळ हे गोव्यातील एक नावाजलेले मंडळ. आतापर्यंत या पथकाने विविध स्पर्धांमध्ये जवळपास २०० पेक्षा अधिक प्रथम क्रमांकाची पारितोषिके पटकावली आहेत. तर, २०२२ मध्ये या पथकाने तब्बल ४७ पहिल्या क्रमांकाची बक्षिसे मिळविली, जो एक विक्रमच ठरला आहे.

Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023: फोंड्यातील चतुर्थीचा बाजार मार्केटमध्येच

स्वर साई घुमट आरती मंडळ राज्यपातळीवरील आयोजित घुमट आरती स्पर्धांसह तालुका, जिल्हा तसेच अखिल गोवा पातळीवर स्पर्धांत सहभाग घेते. या पथकाने आपल्या सादरीकरणातून स्वतःची वेगळी छाप गोमंतकीयांमध्ये निर्माण केली आहे.

या आरती मंडळात विविध वयोगटातील युवांचा सहभाग असून त्यांना पूजेस्थळी किंवा घरांमध्ये विशेषतः घुमट आरती सादरीकरणासाठी आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. स्वर साई घुमट आरती मंडळाचाचा ड्रेस कोड हा भगवा व ऑफ व्हाईट कोटी आहे.

मंडळाचे शिलेदार

या आरती मंडळात आशिष नरसुले (अध्यक्ष), स्वप्‍निल म्हापसेकर, पद्ममेश नाईक, साईनाथ राऊळ, पृथ्वीराज गावस, योगेश वळवईकर, दीक्षीत साळगावकर, अभिजीत नरसुले, ओमकार शिरोडकर, साईश चोडणकर, रोहन नागवेकर, स्वप्‍निल कळंगुटकर, साहिल कळंगुटकर, परेश नाईक, ब्रिजश भोसले, नवज्योत गोलतेकर, बालकृष्ण आईर, प्रतीक चोडणकर, वरद साळगावकर, युगेश शिरोडकर, सिद्धांत शिरोडकर, आकाश वायंगणकर व राज केरकर यांचा समावेश आहे.

यंदा वैयक्तिक तसेच सदस्यांच्या कौटुंबिक कारणांमुळे स्पर्धांपासून थोडेसे अलिप्त राहण्याचे मंडळाने ठरविले असले तरी हा अंतिम निर्णय नाही. आम्ही आजही रात्रीच्या वेळी दोन तास तालीम करतोय. आम्ही निमंत्रणस्थळी सादरीकरण करणार आहोत आणि आतापासून विविध भागांतून आमंत्रणे येत आहेत. शिवाय शिर्डीच्‍या श्री साईबाबा मंदिरात येत्‍या दिवाळीत आमचे घुमट आरती सादरीकरण असणार आहे.

साईनाथ राऊळ, स्वर साई घुमट आरती मंडळाचे सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com