डिचोलीतील युवकाचा संशयास्पद मृत्यू, गूढ वाढलं

तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात, डिचोलीत उलटसुलट चर्चा
suspicious death in bicholim
suspicious death in bicholimdainik gomantak
Published on
Updated on

डिचोली : डिचोलीत एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मारहाणीतून हा मृत्यू झाल्याची चर्चा शहरात सुरु आहे. तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात असून डिचोली परिसरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

suspicious death in bicholim
सांकवाळ येथे अपघातात दोन तरुण ठार; महिला जखमी

डिचोलीत (Bicholim) काल रात्री उशिरा शहरातील अभिनव दूध सोसायटीजवळ हा तरुण मृतावस्थेत सापडला होता. मृत तरुण डिचोलीतील गावकरवाडा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. मयत युवकाचे डोके फुटले होते, तर जवळच चप्पल होते. ही घटना घडण्यापुर्वी मयत युवकासमवेत तेथीलच एक युवक होता, अशी माहिती मिळाली आहे.

suspicious death in bicholim
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, टँकर चालकाला बेड्या

पोलिसांनी (Police) मयत युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत (GMC) पाठविला आहे. मयत युवक आणि त्याचा साथीदार मद्याच्या नशेत होते. अशी माहिती मिळाली आहे. शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिस चौकशी सुरु केली असून पुढील तपास केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com