Cyber Crime: क्रिप्टो व्यवहारांचा वापर करून फसवणूक, गुजरातच्या तरुणाला कळंगुट येथे अटक

Cyber Crime Goa Arrest: संशयित विशाल गोहिल हा गोपनीय माहिती मिळवण्याचा आणि ती टेलिग्रामसह एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीसाठी देण्याचा प्रयत्न करत होता.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा वापर करून ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे संवेदनशील वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करण्याचा आणि व्यापार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सायबर गुन्हे पोलिसांनी संशयित विशाल गोहिल (४२) अहमदाबाद -गुजरात येथील तरुणाला कळंगुट येथून अटक केली आहे.

संशयित विशाल गोहिल हा गोपनीय माहिती मिळवण्याचा आणि ती टेलिग्रामसह एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे विक्रीसाठी देण्याचा प्रयत्न करत होता आणि व्यवहार लपविण्यासाठी क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे पैसे मिळवत होता असे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक निष्कर्षावरून दिसून येत आहे.

Cyber Fraud
Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 1.2 कोटींच्या सायबर फसवणुकीप्रकरणी कर्नाटकातील 63 वर्षीय व्यक्तीला अटक

संशयित सध्या पोलिस कोठडीत असून त्याने गुन्ह्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही सहषडयंत्रकर्त्यांची किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मची पडताळणी करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. संशयिताची पूर्ण माहिती मिळवून त्याला अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने ताब्यात घेण्यात आले.

Cyber Fraud
Goa Crime: खळबळजनक! ड्रग्ज प्रकरणात महिलेला केली अटक, न्यायालयात 2 वकिलांसह चौघाजणांवर केले लैंगिक अत्याचाराचे आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित विशाल गेल्या काही वर्षापासून कळंगुट येथे भाड्याच्या घरात कुटुंबासह राहतो. त्याची पत्नी किनारी भागातील कसिनोत कामाला होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com