Goa Crime News, drugs case woman allegation
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime: खळबळजनक! ड्रग्ज प्रकरणात महिलेला केली अटक, न्यायालयात 2 वकिलांसह चौघाजणांवर केले लैंगिक अत्याचाराचे आरोप

Goa Drug Case: कोलवा पोलिसांनी दोन वकिलांसह चौघांवर सामूहिक बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद केला आहे. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्‍याने पोलिसांनी गुप्‍तता पाळली आहे.
Published on

मडगाव: ड्रग्‍स प्रकरणात अटक केलेल्‍या एका संशयित महिलेला न्‍यायालयात उभे केले असता, दोघा वकिलांनी आणि त्‍यांच्‍या अन्‍य दोन मित्रांनी आपल्‍यावर बलात्‍कार केल्‍याची तक्रार भर न्‍यायालयातच तिने केल्‍याने खळबळ माजली आहे.

या प्रकरणी कोलवा पोलिसांनी दोन वकिलांसह चौघांवर सामूहिक बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद केला आहे. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे असल्‍याने पोलिसांनी गुप्‍तता पाळली आहे. त्‍या महिलेने केलेली तक्रार खरी आहे की खोटी, याचाही तपास केला जात आहे.

या पीडित महिलेला अलीकडेच एका ड्रग्‍ज प्रकरणात अटक झाली होती. तिला न्यायालयात उभे केले असता, ‘‘अटकेत असताना पोलिसांकडून तुला काही त्रास तर होत नाही ना?’’ अशी विचारणा न्यायाधीशांनी केली असता, तिने ‘‘नाही’’ असे उत्तर दिले.

मात्र पूर्वी आपल्यावर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा पाढाच तिने वाचला. न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तपासाचा आदेश दिले. आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

Goa Crime News, drugs case woman allegation
Goa Crime: व्हेंटिलेटरच्या छिद्रातून कपडे बदलताना अल्पवयीन मुलीचा Video काढण्याचा प्रयत्न; परप्रांतीयावर गुन्हा दाखल

कोलवा पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करत आहेत. सध्‍या हे तपासकाम प्राथमिक स्‍तरावर असल्‍याने आणि प्रकरण गुंतागुंतीचे असल्‍याने पोलिसांनी गोपनीयता बाळगली आहे.

Goa Crime News, drugs case woman allegation
Goa Crime: गरोदर महिलेसह पतीला सळ्यांनी मारहाण करणाऱ्या तिघांना 5 दिवसांची कोठडी; पार्किंगच्या वादातून केला भीषण हल्ला

माजोर्डा, पणजीत केला अत्‍याचार!

या प्रकरणातील पीडित महिलेला पोलिसांनी यापूर्वी एका प्रकरणात अटक केली होती. त्‍यावेळी तिच्‍या जामिनासाठी एका वकीलाने केस घेतली होती. त्‍याने तिला या प्रकरणात जामीनही मिळवून दिला होता. पीडितेने दिलेल्‍या तक्रारीनुसार, त्‍यानंतर या वकिलाने तिच्‍या मर्जीविरुद्ध कित्‍येकदा तिच्‍यावर बलात्‍कार केला. सुरवातीला माजोर्डा येथील एका हॉटेलमध्‍ये, त्‍यानंतर पणजीत एका फ्लॅटवर त्‍याने आपल्या अन्य एका वकील मित्रासह बलात्कार केला. मागाहून अन्य दोघांना बोलाविले. त्यांनीही आपल्‍यावर बलात्कार केला, असे या महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com