Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

Sunburn Festival Moves to Mumbai: आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, हा तीन दिवसांचा भव्य फेस्टिव्हल 19, 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
Sunburn Festival 2025
Goa SunburnDainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Festival Moves to Mumbai: आशियातील सर्वात मोठा डान्स म्युझिक (EDM) फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणारा 'सनबर्न फेस्टिव्हल' (Sunburn Festival 2025) आता गोव्यातील आपली 17 वर्षांची परंपरा मोडून पहिल्यांदाच मुंबईत होणार आहे. आयोजकांनी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, हा तीन दिवसांचा भव्य फेस्टिव्हल 19, 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी, मुंबईत होणाऱ्या या ऐतिहासिक आयोजनामुळे देशभरातील संगीतप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानेही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

सनबर्नचा गोव्यातून मुंबईत स्थलांतर करण्याचा निर्णय काही अचानक घेतलेला नाही. आयोजकांनी केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार, या बदलामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. आयोजकांनी देशभरात एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये, सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 50 टक्के लोकांनी 'सनबर्न फेस्टिव्हल गोव्याबाहेर आयोजित केला जावा' अशी इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे, अशा आयोजनासाठी मुंबईला सर्वाधिक पसंती मिळाली. त्यानंतर आयोजकांनी हा निर्णय घेतला.

Sunburn Festival 2025
Sunburn Festival: ‘सनबर्न’ची सुनावणी 11 फेब्रुवारीपर्यंत तहकूब; याचिकादारांनी मागितला वेळ

सनबर्न फेस्टिव्हलचे मुंबईत होणारे आयोजन हे केवळ ठिकाणातील बदल नाहीतर ते एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. 'Sunburn invites you into a world BEYOND REALITY' (वास्तविकतेच्या पलीकडचे जग) या घोषणेसह हा फेस्टिव्हल मुंबईत येत आहे.

मुंबईसारख्या मेट्रो शहरात हा फेस्टिव्हल आयोजित केल्याने तो अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरील पारंपरिक वातावरणाऐवजी, आता मुंबईतील अत्याधुनिक सेटअपमध्ये हा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.

आयोजकांचा दृष्टिकोन

सनबर्नचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करण सिंग यांनी या निर्णयाबद्दल बोलताना म्हटले की, "जवळपास दोन दशकांपूर्वी आम्ही एक साधी पण प्रभावी कल्पना घेऊन या फेस्टिव्हलची सुरुवात केली. गोव्याने या फेस्टिव्हलच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण एक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यात बदल करणे आवश्यक असते. सनबर्नला मुंबईत आणणे हा एक योग्य निर्णय वाटतो."

Sunburn Festival 2025
Sunburn Festival: 'सनबर्न' जवळ आल्यावर आर्लेकरांचा विरोध का मावळला? दुटप्‍पी भूमिकेमुळे पेडणेवासीय नाराज

'Ascend: Beyond the Real' थीम

यंदाच्या सनबर्न फेस्टिव्हलची थीम “Ascend: Beyond the Real” अशी आहे. आयोजकांच्या मते, या थीमद्वारे प्रेक्षकांना अपग्रेडेड प्रोडक्शन, आकर्षक स्टेज डिझाइन आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह एक पूर्णपणे नवीन आणि इमर्सिव्ह अनुभव (immersive experience) मिळेल.

सनबर्नने गेल्या अनेक वर्षांपासून मार्टिन गॅरिक्स, डीजे स्नेक, टिएस्टो आणि स्वीडिश हाउस यांसारख्या अनेक जागतिक स्तरावरील कलाकारांना भारतात आणले आहे. यावर्षी, डीजे मॅगच्या प्रतिष्ठित 'टॉप 100 फेस्टिव्हल ऑफ 2025' (Top 100 Festivals of 2025) यादीत सनबर्नने 8वे स्थान पटकावले.

Sunburn Festival 2025
Sunburn Festival: 'सनबर्न'ला आधी विरोध नंतर स्वागताचे बॅनर! Social Mediaवर 'लोकांच्या मताला किंमत किती?’ प्रश्नाची सरबत्ती

सनबर्न 2025 ची तिकीट विक्री

  • RuPay Pre-Sale: 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, RuPay क्रेडिट कार्ड धारकांसाठी 48 तासांसाठी खास तिकीट विक्री सुरू होईल.

  • Public Sale: 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, BookMyShow द्वारे सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री सुरु होईल.

गोव्यातील 17 वर्षांची परंपरा सोडून सनबर्न फेस्टिव्हल आता मुंबईत एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहे. यामुळे मुंबईतील संगीतप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com