Women's Day 2023 : गोमंतकीय महिला अनेक क्षेत्रांत अग्रेसर : सुलक्षणा सावंत

‘पिंक फोर्स’ करणार आणखी सज्ज आणि सक्षम : सुनीता सावंत
Women's Day 2023
Women's Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

(गंगाराम आवणे)

पुरुष व महिलांमधील असमानता हा वैश्‍विक प्रश्‍न आहे. तो केवळ गोव्यापुरता मर्यादित नाहीय. परंतु गेल्या काही वर्षांत हा प्रश्‍‍न सोडविण्‍यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत.

त्यामुळे गोमंतकीय महिला आज अनेक क्षेत्रांत अग्रेसर बनल्‍या आहेत, असे भाजप नेत्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

तर, ‘पिंक फोर्स’ आणखी सक्षम करण्‍यात येईल, असे पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी सांगितले. महिलादिनाचे औचित्‍य साधून ‘गोमन्तक टीव्ही’वर आयोजित महिलांच्या विविध समस्यांवरील विशेष कार्यक्रमात सुलक्षणा सावंत व सुनीता सावंत बोलत होत्‍या.

लेखिका ज्योती कुंकळकर यांनी त्‍यांची मुलाखत घेतली. उभयतांनी महिलांच्या विविध प्रश्‍नांवर आपली मते व्यक्त केली.

Women's Day 2023
Women's Day 2023: महिलींनी हेल्दी राहण्यासाठी करावे 'हे' 10 काम

सुनीता सावंत म्हणाल्या, सर्वच महिला सशक्त नसतात. माझ्या ३२ वर्षांच्या सेवेत ज्याप्रमाणे अनुभव, संस्कार घडलेत, त्‍याप्रमाणे मी घडत गेले. चांगले शिक्षण मिळाले, कुटुंबीयांकडून प्रोत्साहन मिळाले. मी जेव्हा पोलिस सेवेत रूजू झाले, त्यावेळी साखळीची एकही महिला किंवा पुरुष पोलिस सेवेत नव्हता.

आईवडिलांनी दिलेल्‍या प्रोत्साहनामुळे आणि शिक्षणामुळे मी पुढे गेले. त्यामुळे शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षणाशिवाय सध्‍याच्‍या युगात पर्याय नाही, असेही सावंत म्‍हणाल्या.

"‘पिंक फोर्स’मध्ये किमान दोन महिला पोलिस कर्मचारी असावे लागतात. कामाच्या तीन पाळ्या असल्याने तसेच ज्‍येष्ठ महिला पोलिसांना त्‍या कामात घेऊ शकत नसल्याने पिंक फोर्स प्रामुख्याने किनारीपट्ट्यात व शहरी भागात आहे. परंतु आता मोठ्या प्रमाणात पोलिस भरती झाल्याने येत्या दीड वर्षात पिंक फोर्स अधिक सक्षम होईल."

- सुनीता सावंत, पोलिस अधीक्षक

Women's Day 2023
Women’s Day 2023 : महिलांच्‍या मूळ समस्या समजून घेणे गरजेचे

म्हणून कदाचित महिलांना मंत्रिपद नाही

विधासभेत तीन महिला आमदार आहेत, परंतु एकीलाही मंत्रिपद नाही. यावर बोलताना सुलक्षणा सावंत म्हणाल्या, गेल्या 30 वर्षांनंतर तीन महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या आहेत.

दिलायला लोबो या विरोधी पक्षात होत्या तर जेनिफर मोन्सेरात आणि डॉ. दिव्या राणे या दोघींचे पती मंत्री असल्‍यामुळे कदाचित त्‍यांना मंत्रिपद दिले गेले नसावे. परंतु सरकार आपली धोरणे तयार करताना महिलाकेंद्रित विचारांना प्राधान्य देत सक्षमतेने निर्णय घेत आहे. प्रसारमाध्यमे मंत्रिपदाच्या अनुषंगाने वेगळा विचार करतात.

"समाजात बदल घडवून आणण्यासाठी विचारांमध्‍ये बदल घडविणे गरजेचे आहे. आमचा आवाज ऐकून त्यावर प्रतिक्रिया उमटल्या पाहिजेत. महिलांच्या नावावर घर, ट्रिपल तलाकवर बंदी आदी सकारात्मक पावले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलली आहेत."

- सुलक्षणा सावंत, भाजप नेत्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com