Women's Day 2023: महिलींनी हेल्दी राहण्यासाठी करावे 'हे' 10 काम

जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे.
Women's Day 2023
Women's Day 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Women's Day 2023: दरवर्षी महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. आजच्या काळात महिला प्रत्येक टप्प्यावर पुरुषांपेक्षा पुढे आहेत. महिलाही प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. 

स्त्रियांचे जीवन संघर्षाने भरलेले आहे असे म्हणणे वावग ठरणार नाही. मुलगी, सून, आई, सासू, आजी पर्यंतची प्रत्येक जबाबदारी ती पार पाडते. महिलांशी निगडीत असे अनेक प्रश्न आहेत ज्याकडे स्त्रियाच बऱ्याच काळापासून दुर्लक्ष करत आहेत. हे

प्रश्न त्याच्या आरोग्याशी निगडीत असतात. जर तिने स्वतःची काळजी घेतली तर ती निश्चितपणे दीर्घकाळ निरोगी (Healthy) राहील. कारण ते म्हणतात की आरोग्य चांगले असेल तर सर्व काही चांगले आहे. चला तर मग आता जाणून घेऊया त्या कामांबद्दल जे प्रत्येक महिलेने आजपासूनच करायला सुरुवात केली पाहिजे.

  • तणाव कमी करणे

तज्ज्ञांच्या मते महिला (Women) खूप ताण घेतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. करिअर आणि जबाबदारीमुळे तणाव घेणे खूप सामान्य आहे. परंतु तणाव हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही.

त्यामुळे ताणतणाव न घेता तुमच्या समस्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा आणि त्यावर उपाय शोधावा. टेंशन घेतल्याने वंध्यत्व, नैराश्य, चिंता आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान आणि योगा (Yoga) देखील करू शकता.

  • पाणी भरपुर प्यावे

आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात मोठा घटक म्हणजे शरीराला हायड्रेट ठेवणे होय. शरीराचा सुमारे 60 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो, याचा अर्थ तुमच्या शरीरातील अवयव आणि पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते.

त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे जेणेकरून आरोग्य चांगले राहते. अधिक पाणी पिल्याने संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्वचेचे (Skin) आरोग्य सुधारते, शरीरातील कचरा काढून टाकला जातो आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात सहज उपलब्ध होतात. 

  • पुरेशी झोप

पुरेशा झोपेचा शरीराला खूप फायदा होतो. कारण असे म्हणतात की 'पुरेशी झोप ही आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्याने मन आणि शरीर रिसेट होते.

महिलांबाबत अनेकदा असे दिसून येते की अनेकवेळा घरातील काम, अभ्यास किंवा मुलांमुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात आणि नंतर लवकर उठतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही किमान 7-8 तासांची झोप (Sleep) घेतली पाहिजे.

women day 2023
women day 2023Dainik Gomantak
  • निरोगी पदार्थ खा 

जंक किंवा फास्ट फूड खाण्याचा प्रत्येकालाच आवड असती. पण या गोष्टींमुळे शरीराला खूप नुकसान होते. त्यामुळे पुरुषांसोबतच महिलांनाही पौष्टिक पदार्थ सेवन करावे. ताजी फळे किंवा भाज्या, संपूर्ण धान्य, ब्राऊन राइस, क्विनोआ, ओट्स, फळे इत्यादींचा आहारात समावेश करावा. 

  • आपल्या शरीराचे ऐका 

उत्तम आरोग्यासाठी तुमच्या शरीराचे ऐकणे केव्हाही फायदेशीर आहे. जर तुमचे शरीर खूप थकल्यासारखे सिग्नल देत असेल, त्याला पोषणाची गरज असेल आणि तुम्हीही शरीरासोबत काम करणार असाल किंवा कामामुळे खाणार नसाल तर हे शरीराला इजा होईल. असे केल्याने ऊर्जा कमी होते, पचन बिघडते इ. म्हणूनच तुमच्या शरीराच्या गरजांची नेहमी विशेष काळजी घ्या.

  • दररोज किमान 20-30 मिनिटे चाला 

फिट राहण्यासाठी तुम्हाला काही तास जिममध्ये घालवण्याची गरज नाही. त्याऐवजी रोज 20-30 मिनिटे चालणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कार्डिओ, वेट ट्रेनिंग होम वर्कआउट्स इत्यादी करू शकता. 

  • व्हिटॅमिन-खनिजयुक्त पदार्थांचे सेवन करावे

पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात जीवनसत्त्व आणि खनिजांची कमतरता अधिक आढळते. म्हणूनच नेहमी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध पदार्थांचे सेवन करावे, जेणेकरून भविष्यात कोणताही रोग होणार नाही. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, फोलेट, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12, मॅग्नेशियम असलेले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करावे. 

Fruits
FruitsDainik Gomantak
  • अधिक फायबर असलेले पदार्थ खावे

पचन, त्वचेची गुणवत्ता आणि पोटाचे आरोग्य योग्य ठेवण्यासाठी फायबर युक्त पदार्थ खाणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आहारात फायबर युक्त भाज्या आणि धान्ये जरूर घ्यावा.

  • डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा

महिलांनी वेळोवेळी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुमचे वय 21 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, दर 3 वर्षांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी पॅप चाचणी करावी.

तुमचे वय 30-65 असल्यास, तुम्ही दर 5 वर्षांनी पॅप चाचणी आणि HPV चाचणी दोन्ही करू शकता. जर तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल आणि एसटीडीचा उच्च धोका असेल तर, क्लॅमिडीया, गोनोरिया आणि सिफिलीससाठी दरवर्षी चाचणी करु शकता. 

  • नेहमी आनंदी रहा 

शेवटची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महिलांनी नेहमी आनंदी आणि सकारात्मक राहणे खूप महत्वाचे आहे. मुलगी असो, सून असो, आई असो किंवा सासू असो, ती घरातील सदस्यांना धीर देते, त्यामुळे नेहमी आनंदी राहाणे गरजेचे आहे. तसेच काही अडचण असेल तर कुटुंबातील सदस्यासह शेअर करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com