Goa IIT Project: 'आयआयटी’ला फर्मागुढीत चांगली जागा, ढवळीकरांचे प्रतिपादन; पर्रीकरांशीही बोलल्याची करुन दिली आठवण

Sudin Dhavalikar: सुदिन ढवळीकर म्हणाले की, तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: फर्मागुढी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध झाला आहे. या ठिकाणी उच्च शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असून ‘आयआयटी’ला फर्मागुढीत चांगली जागा उपलब्ध होऊ शकते, असे मत मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.

सुदिन ढवळीकर म्हणाले की, तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. ‘आयआयटी’ प्रकल्प गोव्यात उभारताना फर्मागुढीचा विचार त्यावेळी झाला होता. आपण त्यासाठी मनोहर पर्रीकर यांना फर्मागुढीचा पर्याय दिला होता. फर्मागुढीत सध्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात भरच पडली असती.

‘आयआयटी’सारखा प्रकल्प गोव्यात हवाच आहे; पण सद्यस्थितीत दहा लाख चौरस मीटर जमीन एकत्रित मिळणे कठीण झाले आहे. कोडार येथील ‘आयआयटी’संबंधी आपण वक्तव्य करणार नाही, तो सरकारचा प्रश्‍न आहे; पण ‘आयआयटी’ फर्मागुढीत येण्यास जमिनीची अनुकूलता असून आवश्‍यक जागा हवी असल्यास त्यासाठी जमीन संपादन करता येऊ शकते, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

Sudin Dhavalikar
Codar: "देवा राखणदारा, IIT Project फाटी घें" कोडार ग्रामस्थांनी देवाला घातले ‘गाऱ्हाणे’; सरपंचाच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा

दरम्यान, फोंडा हा परिसर शैक्षणिक हब म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, आयआयटी महाविद्यालय असून एनआयटी महाविद्यालयही कार्यरत आहे. त्याशिवाय, आयटीआय, फार्मसी महाविद्यालय, शिक्षण महाविद्यालय व इतर महाविद्यालये कार्यरत आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी अशी सर्व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांना ते सोयिस्कर ठरू शकते, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

Sudin Dhavalikar
Goa News: 'फर्मागुडीतील पठरावर IIT प्रकल्प उभारल्यास शैक्षणिक हब होईल'; सुदिन ढवळीकरांचा दावा; वाचा दिवसभरातील घडामोडी

बांदोडा-फोंडा अंडरपास होणार खुला

बांदोडा-फोंडा अंडरपासचे काम पूर्णत्वास आले असून आता फक्त हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम तेवढे शिल्लक आहे. येत्या महिन्यात हॉटमिक्स प्लांट कार्यरत होणार असून त्यानंतर पाऊस नसल्यास हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. बांदोडा अंडरपास ते शापूरपर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम झाल्यानंतर हा अंडरपास खुला करण्यात येईल, त्यासाठी साधारण पंधरवड्याभराचा अवधी लागेल, अशी शक्यता स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com