Goa News: 'फर्मागुडीतील पठरावर IIT प्रकल्प उभारल्यास शैक्षणिक हब होईल'; सुदिन ढवळीकरांचा दावा; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यात ठळक आणि ताज्या घडामोडी. राजकार, क्रीडा, मनोरंजन, आणि इतर घडामोडी.
Goa Politics: सुदिन अजूनही मुख्यमंत्री होऊ शकतात?
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

"भाजपने गुंडागिरी करण्याऐवजी रस्ते दुरुस्त करावे"

"आप'चे सरचिटणीस संघटन श्रीकृष्ण परब म्हणाले की, "भाजपने गुंडागिरी करण्याऐवजी रस्ते दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे, गोव्यातील लोकांना तुमच्या धमक्यांऐवजी चांगले रस्ते हवे आहेत".

गोवा सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाला SKOCH सुवर्ण पुरस्कार

गोवा सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाला "अंगणवाडी सेवांद्वारे बाल पोषण सुधारणे" या प्रतिष्ठित SKOCH सुवर्ण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे.

फर्मागुडी येथील पठरावर आयआयटी प्रकल्प उभारल्यास शैक्षणिक हब होईल

फर्मागुडी येथील पठरावर आयआयटी प्रकल्प उभारल्यास शैक्षणिक हब होईल - वीज मंत्री सुदिन ढवळीकर

आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ शी संबंधित १०० कार्यक्रम

यावर्षी आम्ही आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ शी संबंधित १०० कार्यक्रम साजरे करत आहोत ज्यात क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि परिषदांचा समावेश आहे. आम्ही मॅरेथॉन धावण्याचे आयोजन केले आहे असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

आयआयटीक विरोध; कोडार ग्रामस्थांचे लंगडेश्वर आजोबाक साकडे...

मुलाकडून पित्याचा सत्कार!

आमदार जीत आरोलकर यांनी आपले वडील विनायक आरोलकर यांचा पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी सोसायटी यांच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी अध्यक्ष म्हणून सत्कार केला

सत्तरी येथील 35 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार

सत्तरी येथील पोडोशी येथील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार करून जखमी केल्याचा आरोप आहे. त्याला उपचारासाठी जीएमसी येथे हलविण्यात आले आहे. वाळपई पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वॅगन आर आणि सियाझ कारला जाणूनबुजून आग लावल्याबद्दल अज्ञात आरोपीविरुद्ध FIR

मंगळवारी सकाळी वॅगन आर आणि सियाझ कारला जाणूनबुजून आग लावल्याबद्दल अज्ञात आरोपीविरुद्ध कुडचडे पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर वाढले!

मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहन पार्किंगचे दर आज जीएमआरने पुन्हा वाढवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com