FC Goa: एफसी गोवा संघात नवा खेळाडू, मणिपुरी बोरिस सिंगसोबत दीर्घकालीन करार

आगामी मोसमासाठी एफसी गोवा संघाने करारबद्ध केलेला बोरिस हा चौथा नवा फुटबॉलपटू आहे.
FC Goa Signs Boris Singh
FC Goa Signs Boris SinghDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa Signs Boris Singh: भन्नाट वेग, भक्कम बचाव आणि जबरदस्त आक्रमकता यांचा सुरेख संगम साधणारा युवा फुटबॉलपटू बोरिस सिंग याच्याशी एफसी गोवा संघाने दीर्घकालीन करार केला. 23 वर्षीय मणिपुरी खेळाडू जमशेदपूर एफसीमधून गोव्यात संघात दाखल झाला.

2017 साली 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघातून खेळलेला बोरिस इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूरतर्फे उल्लेखनीय ठरला होता. 2021-22 मध्ये आयएसएल शिल्ड जिंकलेल्या जमशेदपूर संघात त्याचा समावेश होता.

आगामी मोसमासाठी एफसी गोवा संघाने करारबद्ध केलेला बोरिस हा चौथा नवा फुटबॉलपटू आहे. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने यापूर्वी रॉलिन बोर्जिस, संदेश झिंगन व उदांता सिंग यांना संघात सामावून घेतले आहे.

"एफसी गोवा संघात दाखल होताना मी आनंदित आहे. क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरीसाठी मी इच्छुक आहे, जेणेकरून चाहते खूष होतील," असे बोरिसने करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. "एफसी गोवा संघाची खेळण्याची शैली मला आवडते. मानोलो (मार्केझ) यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवातर्फे खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. मानोलो यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंची कारकीर्द बहरल्याचे मी पाहिले आहे," असे बोरिसने नमूद केले.

FC Goa Signs Boris Singh
Sahitya Akademi Award: साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा, गोव्यातील दोन लेखकांची बाजी

"महत्त्वाकांक्षी आणि विलक्षण प्रतिभा असलेला खेळाडू बोरिस याला करारबद्ध केल्याने एफसी गोवा संघ रोमांचित आहे. मैदानावरील त्याच्या कामाची क्षमता आणि अथक परिश्रम घेण्याची वृत्ती यामुळे त्याने मान्यता प्राप्त केली असून आमच्या संघात सखोल वैविधता जोडली जाईल. अपवादात्मक अशी तांत्रिक जाण असल्यामुळे तो कोणत्याही जागी चमक दाखवू शकतो. आमच्या प्रशिक्षण चमूसाठी तो मौल्यवान ठरेल आणि क्लबसमवेत प्रगती साधेल याचा मला विश्वास वाटतो," असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कूर यांनी बोरिसचे संघात स्वागत करताना सांगितले.

FC Goa Signs Boris Singh
Goa Monsoon Update: गोव्यात पुढील पाच दिवस 'मुसळधार', दिवसभर राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

फुटबॉलपटू बोरिस सिंग याच्याविषयी

- मणिपूरच्या खेळाडूत विंगर आणि विंग बॅक जागी, तसेच बचाव व आक्रमक फळीत खेळण्याची क्षमता

- एआयएफएफ एलिट अकादमीत जडणघडण

- 2017 सालच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, 2 सामने खेळला

- आय-लीगमधील 2 दोन मोसमात इंडियन ॲरोजतर्फे 31 सामने

- 2020-21 मध्ये आयएसएलमधील एटीके मोहन बागान संघात दाखल

- त्यानंतर जमशेदपूर एफसीशी करार, 2021-22 मध्ये लीग विनर्स शिल्ड विजेता

- 2022-23 मध्ये जमशेदपूरतर्फे आयएसएल व सुपर कपमध्ये मिळून 4 गोल

- एकंदरीत आयएसएल स्पर्धेतील 3 मोसमात 41 सामने, 5 गोल, 3 असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com