Goa Electricity Department: वीज क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार गंभीर, सुदिन ढवळीकरांचा दावा

Sudin Dhavalikar: संपूर्ण गोव्यात वीज क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार गंभीर असून, प्रयत्नही सुरू आहेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: वीज ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून, वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठी संपूर्ण गोव्यात वीज क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सरकार गंभीर असून, प्रयत्नही सुरू आहेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देशात ५०० मेगाव्हॅट ग्रीन वीजनिर्मिती करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहितीही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी दिली. सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून थिवी ते लामगाव वीज उपकेंद्रापर्यंत आता ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिनी घालण्यात येणार आहे. या कामाची पायाभरणी केल्यानंतर वीजमंत्री ढवळीकर बोलत होते.

नामफलकाचे अनावरण करून आणि श्रीफळ वाढवून वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कामाची पायाभरणी केली. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, उपनगराध्यक्ष दीपा पळ, वल्लभ साळकर, वीज खात्याचे अधीक्षक अभियंता शैलेश बुर्ये, कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत आदी उपस्थित होते.

यावेळी शैलेश बुर्ये यांनी प्रास्ताविकपर भाषणात प्रकल्पाची माहिती दिली. सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले. वल्लभ सामंत यांनी आभार मानले.

Sudin Dhavalikar
Maruti Suzuki Electric Car: क्रेटा इलेक्ट्रिकला देणार टक्कर! मारुतीची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात, फिचर्स, मायलेज आणि किंमत जाणून घ्या

नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव

वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणताना पुढील २५ ते ३० वर्षे वीज समस्या उद्भवणार नाही. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यानंतर सुमारे ३९ कोटी रुपये खर्च करून थिवीहून साळ वीज उपकेंद्रापर्यंत भूमिगत वीजवाहिनी घालण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील वीजसमस्या कायमची सुटणार आहे, असे डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.

Sudin Dhavalikar
Goa Green Energy: हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 2029 पर्यंत गाठू! सुदिन ढवळीकरांनी व्यक्त केला विश्वास

डिचोली वीज उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. दरम्यान, सरकारच्या सहकार्यातून मये मतदारसंघातील पाच पंचायत क्षेत्रात भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मये मतदारसंघात वीज उपकेंद्र स्थापन करण्याची ग्वाही दिल्याबद्दल वीजमंत्री ढवळीकर यांना धन्यवाद देतो, असे प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com