Goa Green Energy: हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट 2029 पर्यंत गाठू! सुदिन ढवळीकरांनी व्यक्त केला विश्वास

Sudin Dhavalikar: गोवा विनामूल्य वीज योजना आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसीसारख्या उपक्रमांद्वारे राज्य इलेक्ट्रिक स्वयंपाकाकडे वळवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: केंद्र सरकारने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गोवा हे उद्दिष्ट २०२९ पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला.

पर्वरीत सचिवालयातील परिषद सभागृहात राज्यातील सहा तालुक्यातील ६५० अंगणवाड्यांना ‘इंडक्शन कुकटॉप’चे वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला.

ते म्हणाले, वीज खाते गोवा ऊर्जा विकास संस्थेसोबत, छतावरील सौर यंत्रणेसाठी प्रोत्साहन आणि बायोगॅस प्रकल्पासाठी अनुदान यासह विविध योजनांद्वारे स्वच्छ स्वयंपाकास प्रोत्साहन देत आहे. गोवा विनामूल्य वीज योजना आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसीसारख्या उपक्रमांद्वारे राज्य इलेक्ट्रिक स्वयंपाकाकडे वळवण्यावर लक्ष केंद्रित करीत आहे.

Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar: ..विरोधकांनी दिशाभूल केली! गोव्यात 'एक कोटी' घरांना फायदा; 'सोलर फार्म'साठी पुढाकार घेण्याचे वीजमंत्र्यांचे आवाहन

यावेळी राज्य नियुक्त एजन्सीचे नोडल अधिकारी तथा अधीक्षक अभियंता मयूर हेदे, सीडीपीओ, मुख्यसेविका व इतर उपस्थित होते. शैलेश बुर्ये यांनी स्वागत केले. मेघा नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राजीव नाईक यांनी आभार मानले.

Sudin Dhavalikar
Goa Green Power: गोव्यात 150 MW ऊर्जा निर्मिती गरजेची, PM Surya Ghar योजना गावागावांत जावी; वीजमंत्री ढवळीकर

सहा तालुक्यात अंगणवाड्यांना लाभ

या कार्यक्रमात स्वच्छ स्वयंपाक कार्यक्रमाच्या प्रचारांतर्गत इंडक्शन कुकटॉप्स देण्यात आले. सत्तरी, डिचोली, बार्देश, फोंडा, सासष्टी आणि केपे या सहा तालुक्यांतील अंगणवाड्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुढील टप्प्यात इतर तालुक्यातील उर्वरित अंगणवाड्या या योजनेअंतर्गत समाविष्ट केल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sudin Dhavalikar MGP BJP Alliance:
Goa Climate Technology Projects
MEA India Energy Security Statement US Tariff
AI Wildlife protection System India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com