Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarGomantak Digital Team

Sudin Dhavalikar : गोव्याच्या इतिहासातून साहित्यनिर्मिती व्हावी!

सुदिन ढवळीकर : शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे साहित्य पुरस्कार प्रदान
Published on

Ponda News : गोव्याला फार मोठा इतिहास असून या इतिहासाचा अभ्यास व्हावा आणि त्यातून साहित्य निर्मिती व्हावी, अशी मनिषा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली. ढवळी - फोंडा येथे आज (रविवारी) जानकी सभागृहात श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे शारदा साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळेला सुदिन ढवळीकर बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार प्राप्त साहित्यिक विनायक खेडेकर, संस्थेच्या अध्यक्ष सुषमा तिळवे, कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर, पुरस्कार निमंत्रक डॉ. विद्या प्रभुदेसाई तसेच मीरा तारळेकर आदी उपस्थित होत्या.

Sudin Dhavalikar
Sachin Tendulkar @50 : सचिनचा 50वा वाढदिवस साजरा होणार गोव्यात

केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही शारदा साहित्य पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना नवीन साहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेने खूप चांगले उपक्रम आयोजित करून नवोदितांना एक चांगली संधी दिली त्यामुळे त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Sudin Dhavalikar
G-20 summit : विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे वेध

विनायक खेडेकर यांनीही आपले विचार व्यक्त करताना नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संगीता अभ्यंकर यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री खांडेपारकर यांनी केले. यावेळी साहित्य पुरस्कारप्राप्त अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. विनायक खेडेकर यांच्या हस्ते साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले तर हे साहित्य पुरस्कार ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचाही गौरव करण्यात आला.

Sudin Dhavalikar
Vastu Tips: जेवण करतांना वास्तुच्या 'या' नियमांचे करावे पालण, घरात लाभेल सुख-शांती

यांना मिळाले पुरस्कार...

उषा पाणंदीकर यांना माधवीताई देसाई स्मृती जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. याशिवाय विविध साहित्य प्रकारात विभा लाड, अपूर्वा कर्पे, मीना समुद्र, मेघना कुरुंदवाडकर, अनुजा जोशी, शेफाली वैद्य, अदिती बर्वे व प्रमदा गावस देसाई यांच्यासह युवा पुरस्कार साक्षी लवंदे, समृद्धी केरकर तसेच फ्रान्सिस फर्नांडिस यांना देण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com