G-20 summit : विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे वेध

9 ते 11 मे दरम्यान आयोजन; पाहुणचाराने भारावून प्रतिनिधी परतले
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात 17 ते 19 एप्रिल या कालावधीत आयोजित दुसरी आरोग्य कार्यगटाची तीन दिवसीय बैठकीची यशस्वीपणे सांगता झाली. या बैठकीस भारतासह 19 देशांतून आलेले 180 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

विविध देशांतील प्रतिनिधींनी आपले कौशल्य, ज्ञान सादर करण्याबरोबरच गोव्यातील आपले अनोखे अनुभवही मांडले. त्यामुळे आता मे महिन्यात होणाऱ्या विकासात्मक कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे वेध सुरू झाले आहेत.

CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Birthday : विशेष मुलांनी मुख्यमंत्र्यांसाठी बनविला पुष्पगुच्छ

पहिल्या बैठकीसाठी सौदी अरेबियाहून आलेल्या डॉ. कमल अल्थोबैती यांनी गोव्याची संस्कृती आणि नृत्याचा आलेला अनुभव मोठ्या उत्साहात व्यक्त केला. तर अमेरिकेतील थेरेसा मॅथ्यू यांनी राज्यातील निसर्गसौंदर्याचे कौतुक केले.

‘आम्ही गोव्याची संस्कृती, स्थानिक लोकनृत्ये पाहिली आणि आम्ही खरोखरच खूप छान वेळ घालवला. गोव्यातील या आदरातिथ्याबद्दल आणि आम्हाला सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद,’ अशी प्रतिक्रिया अल्थोबौती यांनी व्यक्त केली.

जी२० आरोग्य आणि विकासात्मक भागीदारी गटाचे प्रतिनिधी हॅटिस बेटन यांनी भारतीय जी२० अध्यक्षपदाचा भाग म्हणून दुसऱ्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

CM Pramod Sawant
Oceanarium in Goa: गोव्यातील किटला येथे ओशनॅरियम होणार; 800 कोटी रूपये खर्च अपेक्षित

गोव्याच्या आदरातिथ्याचे कौतुक : सावंत

जी-20‘च्या शिखर परिषदेत गोवा सरकारने परदेशी आलेल्या पाहुण्यांचे ज्या पद्धतीने आदरातिथ्य केले, त्याबद्दल परदेशी पाहुण्यांनी राज्याचे कौतुक केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. तीन दिवसीय बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया व राज्यमंत्री डॉ. भारती पवार या गोव्यात होते.

आरोग्याविषयी अनेक विषय चर्चेत आले. या बैठकीच्या रुपाने ‘डिजिटल हेल्थ'' या पूर्व बैठकीस आपण उपस्थित होतो. यशस्वीरित्या ही बैठक आम्ही आयोजित करू शकलो. त्याचबरोबर पाहुण्यांच्या ये-जा करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सुविधेचेही प्रतिनिधींनी कौतुक केल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com