खरी कुजबुज: सुदिन यांच्याकरता देवाला साकडे ?

Khari Kujbuj Political Satire: कला अकादमीच्या आत्तापर्यंतच्या नूतनीकरणाच्या झालेल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
Khari Kujbuj Political Satire: कला अकादमीच्या आत्तापर्यंतच्या नूतनीकरणाच्या झालेल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

सुदिन यांच्याकरता देवाला साकडे ?

एखादा लेख जनमानसावर किती प्रभाव पाडू शकतो, याचे उदाहरण म्हणजे सोमवार २३ सप्टेंबर रोजी ‘गोमन्तक’ मध्ये प्रसिद्ध झालेला वीज मंत्री सुदिन ढवळीकरांवरचा लेख. हा लेख प्रसिद्ध होऊन दहा दिवस झाले तरी सुदिन ढवळीकर यांचे कार्यकर्ते या लेखाच्या ‘हँग ओव्हर’ खाली असलेले दिसत आहेत. उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होत असल्यामुळे बांदीवडे भागातील मंदिरांत मखरोत्सवाची ‘धूम’ सुरू होणार आहे. याचाच फायदा घेऊन सुदिन यांचे मडकई मतदारसंघातील काही कार्यकर्ते म्हणे पात्राव (म्हणजे सुदिन) मुख्यमंत्री व्हावे, म्हणून देवाला साकडे घालणार आहेत. आता बघूया देव त्यांना पावतो काय ते. पण सध्या या कार्यकर्त्यांची मडकई - बांदिवडे भागात चर्चा सुरू आहे, एवढे मात्र खरे. ∙∙∙

‘कला अकादमी’वर अभ्यास समिती; सावध पाऊल

कला अकादमीच्या आत्तापर्यंतच्या नूतनीकरणाच्या झालेल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. कलाकारांच्या मागणीनुसार या समितीत कलाकारांच्या प्रतिनिधींना, चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनच्या सदस्यांना स्थान दिले आहे. ज्या नोडल ऑफिसरने ही समिती तयार केली आहे, ती अत्यंत चाणाक्ष बुद्धीने केलेली आहे. कोणाचे कोणाशी लागेबांधे आहेत, इथपर्यंतची पडताळणी झाली असावी , असे समिती सदस्यांची नावे पाहिल्यानंतर होते. त्याशिवाय समिती निवडीवेळी कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांना बोलाविण्यात आले नाही किंवा त्यांच्या कोणत्याही समर्थकाला समितीत स्थान दिले गेले नाही. मंत्री गावडे यांना जाणूनबुजून यापासून दूर ठेवण्यात आले असावे, असे स्पष्ट दिसते. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामांवरून गोविंद गावडे हे विरोधकांकडून टीकेचे लक्ष्य ठरले आहेत, त्यांच्या सदस्याची या समितीत निवड झाली असती तर तोही वादाचा मुद्दा ठरला असता, त्यामुळेच सरकारने कदाचित सावध पाऊल टाकले आहे, असे म्हणता येईल. ∙∙∙

बिच्चारे उर्फान मुल्ला!

सध्या राज्यात चर्चेच्या ठरत असलेल्या जुलूस प्रकरणावर हाज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला बोलले. ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांतील म्हणून गणले जातात. यामुळे आपल्या विधानाला भाजपचे समर्थन असेल, असे मुल्ला यांनी गृहित धरले असावे. मंगळवारी भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांना मुल्ला यांच्या विधानावरून घेरण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला. यावर वेर्णेकर यांनी सरळपणे मुल्ला हे काही भाजपचे प्रवक्ते नव्हेत, त्यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे सांगून भाजप मुल्ला यांच्या म्हणण्याशी सहमत नाही, असे दाखवून दिले. त्याही पुढे जात वेर्णेकर यांनी मुल्ला यांना कोणताही कॅबिनेट स्टेटस नाही हेही सांगून टाकले. मुल्ला हे भाजपमध्ये आले खरे, मात्र त्याचा राजकीय फायदा भाजपला झाला नसावा, असे वेर्णेकर यांच्या वक्तव्यावरून दिसते. ∙∙∙

जुलूसविरोधात भाजपची भूमिका

काणकोणातील जुलूस या विषयावर सत्ताधारी भाजपची भूमिका काय हे आता स्पष्ट झाले आहे. मंगळवारी भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत या विषयाला वाचा फोडण्यात आली. कोणी चालीरिती संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करू नये. नवी संस्कृती या भूमीवर लादू नये, असे भाजपचे म्हणणे आहे. हीच भाषा काणकोणात या जुलूसाला विरोध करणाऱ्यांच्या तोंडी आहे. यावरून जुलूसाला सत्ताधाऱ्यांचा विरोध असल्याचे अनुमान काढता येते. सोयीस्कर बाबीसाठी प्रशासन याबाबतचा निर्णय घेईल असे सांगण्यात येत आहे असेही आता दडून राहिलेले नाही. ∙∙∙

पणजी बाबूशला आंदण?

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तिसवाडीतील चार मतदारसंघ कॉंग्रेस जिंकेल, असे ठणकावून सांगितले आहे. विरोधी पक्षनेत्याला राजकारणातील खडानखडा माहिती असणे आवश्यक असते. कोणत्या तालुक्यात राजकारणाची कोणती दिशा आहे, याची माहिती विरोधी पक्षनेत्याने ठेवणे अपेक्षित असते. राज्याच्या कोणत्याही भागातील प्रश्‍न समोर आला तरी त्याला उत्तर देण्याची क्षमता अंगी असावी लागते. विधानसभा अधिवेशनावेळी काही प्रश्‍न अभ्यासूपणे आक्रमक शैलीत मांडत आलेमाव यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले तरी त्यांचा राजकीय गृहपाठ मात्र कच्चा आहे. तिसवाडी तालुक्यात चार नव्हे, तर विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. ताळगाव, पणजी, सांताक्रुझ, सांतआंद्रे व कुंभारजुवे असे ते मतदारसंघ. यामुळे आलेमाव चार मतदारसंघ कॉंग्रेस जिंकणार, असे सांगत असल्याने त्यांनी बाबूश मोन्सेरात हेच पणजीतून विजयी होतील, असे गृहित धरले आहे की काय, अशी विचारणा होताना ऐकू येत आहे. ∙∙∙

दरवाजे उघडले कधी?

कॉंग्रेसचे नेते फुटीरांना दरवाजे बंद, असे सांगत सुटले आहेत. पदाधिकारी, प्रदेशाध्यक्षांनंतर आता खासदारांनीही तो राग आळवला आहे. यामुळे दरवाजे कोणी कधी उघडले होते, असा प्रश्न कॉंग्रेसच्या गोटातच चर्चेला आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणा-कोणाला प्रवेश दिला जाणार, अशी खोचक विचारणाही यानिमित्ताने केली जात आहे. निवडून येण्याची क्षमता हा निकष लावून उमेदवारी दिली जाणार असेल तर पक्षनिष्ठेला किंमत ती काय, या प्रश्नाला कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना येत्या काही महिन्यांत सामोरे जावे लागणार आहे. कॉंग्रेस सदस्यत्व मोहीम राबवणार असून त्या निमित्ताने गावा गावात फिरताना या प्रश्‍नांची झळ बसल्याशिवाय राहणार नाही. आधी १० आमदार फुटले, आता ८ आमदार फुटले यामुळे यापुढे आमदार फुटणार नाहीत, याची हमी काय, अशी चर्चा खुद्द कार्यकर्त्यांतच आहे. कॉंग्रेस पक्ष संघटनेत काम करणाऱ्यांचा विचार उमेदवारीसाठी करणार की, आयत्यावेळी उमेदवार आयात केले जाणार, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना निवडणुकीला दोन वर्षे असतानाच पडू लागल्याने नेतृत्वावर किती विश्वास शिल्लक आहे, हे यातून दिसून येऊ लागल्याची चर्चा आहे. ∙∙∙

चर्चेचीच चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासोबत बंद दाराआड कोणती चर्चा केली. याबाबत राज्यभर चर्चा सुरू असून प्रत्येकजण आपापल्या परीने तर्क लावत आहे. परंतु ही चर्चा ज्यांच्यासोबत झाली ते आरोग्यमंत्री महाराष्ट्रात आहेत, तर मुख्यमंत्री ही चर्चा पक्षीय होती, असे सांगताहेत व अतिरिक्त काही विचारल्यास ‘नो कॉमेंट्स’ म्हणत आहेत. त्यामुळे ‘डाल मे कुछ तो काला है’, अशीच चर्चा सुरू राहणार आहे. दिल्लीतील बैठकीत नेमके काय झाले याबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री जोपर्यंत मौन सोडत नाहीत, तोपर्यंत नेमके काय झाले याबाबत चर्चा होतच राहणार आहे आणि हा प्रश्‍न दोघांना सातत्त्याने विचारला जाणार की, दिल्लीतल्या बंद दाराआडच्या बैठकीत नेमकं काय घडलं?. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: कला अकादमीच्या आत्तापर्यंतच्या नूतनीकरणाच्या झालेल्या कामांचा अभ्यास करण्यासाठी सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

रितेश नाईक खूष हुए..!

फोंड्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी मास्टरप्लॅनच्या कार्यवाहीला अखेर प्रारंभ झाला आहे. आता या प्लॅनच्या कार्यवाहीचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर तो माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रितेश नाईक यांना. कारण रितेश नाईक यांनीच या मास्टरप्लॅन कार्यान्वित करण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात मोठे कष्ट घेतले होते. वेळ वाया जाऊ नये म्हणून स्वतः फाईल घेऊन संबंधित खात्याकडे जाणे तसेच संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करणे, सातत्य ठेवणे यात रितेश नाईक माहीर असल्याने या मास्टरप्लॅनच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरवात होत आहे. अर्थातच हे काम कृषीमंत्री रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे सांगायला रितेश विसरत नाहीत! ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com