विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान

चिखली पंचायत ते आल्त दाभोळी विशाल मेगा मार्ट खालील रस्त्याच्या रुंदीकरण संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी करण्यात आली.
विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान
विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: चिखली पंचायत ते आल्त दाबोळी विशाल मेगा मार्ट खालील रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाने सर्वप्रथम रस्त्याचे रुंदीकरण याचा आराखडा चिखली ग्राम विकास समितीसमोर सादर करण्याचे आव्हान एडविन मास्कारेन्हस यांनी केले आहे. जोपर्यंत आराखडा आमच्या समितीपुढे येत नाही तोपर्यंत काम करण्यास चिखली ग्राम विकास समितीने मज्जाव केला आहे. सरकारी पैशाचा दुरुपयोग करून सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाने एका प्रकारे येथील इमारत बांधकाम करणाऱ्या उद्योजकांना बेकायदेशीररित्या सहकार्य केले असल्याचा आरोपही यावेळी मास्कारेन्हस यांनी केला आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाचा फायदा घेऊन बाजूस असलेल्या प्रभू इमारतीने चिखली पंचायतीची परवानगी नसताना संरक्षक भिंत पाडून बेकायदेशीर रस्ता तसेच मुख्य गेट केली असल्याची माहिती एडविन मास्कारेन्हस यांनी दिली. (Submit review of the development work; challenge of Edwin Mascarenhas)

विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान
Goa Rape Case: आसामी युवतीवर बलात्कार प्रकरणी 21 ऑगस्टला सुनावणी

चिखली पंचायत, चिखली ग्राम विकास समिती, मुरगांव नियोजन विकास प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या उपस्थितीत चिखली पंचायत ते आल्त दाभोळी विशाल मेगा मार्ट खालील रस्त्याच्या रुंदीकरण संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी चिखली पंचायतीचे प्रभारी सरपंच कमलाप्रसाद यादव, पंच मारी मास्कारेन्हस, युवराज वळवईकर, मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचे आर्किटेक सहाय्यक मार्कुस फर्नांडिस, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाचे सहाय्यक अभियंते पांडुरंग नाईक, चिखली ग्राम विकास समितीचे याचिकादार ॲडविन मास्कारेन्हस व इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी चिखली ग्रामविकास समितीचे याचिकादार ॲडविन यांनी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला रस्त्याचे रुंदीकरण संरक्षक भिंतीचा आराखडा सादर करण्याचे आदेश जारी केले. तसेच रस्त्याची रुंदी संरक्षक भिंतीची लांबी किती आहे याची सुद्धा माहिती देण्याचे आदेश जारी केले. संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण संरक्षक भिंतीच्या कामाचा फायदा येथील इमारत बांधकाम करणाऱ्या प्रभू बिल्डरने घेऊन बेकायदेशीररीत्या इमारतीची संरक्षक भिंत पाडून रस्ता तयार केला आहे. चिखली पंचायतीची परवानगी नसताना तसेच मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाचा येथील रस्ता १५ मीटर असल्याचे सांगून सदर बेकायदेशीर काम सुरू आहे. मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने प्रभू इमारतीने बेकायदेशीररित्या केलेले काम बंद करण्याचे आदेश जारी केले आहे. यासाठी चिखली पंचायतीने त्वरित प्रभु बील्डरला रस्ता तयार केलेल्या जागेवर संरक्षक भिंत उभारण्याचे आदेश जारी करावे अशी माहिती मास्कारेन्हस यांनी दिली आहे.

विकासकामाचा आढावा सादर करा; एडविन मास्कारेन्हसचे आव्हान
Goa: शिवनाथ बनला मित्राच्या आईसाठी देवदूत..!

चिखली पंचायत ते आल्त दाबोळी पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करताना सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाचा पैशाचा दुरुपयोग केला असून बेकायदेशीररित्या हा रस्ता दहा मीटर करीत असल्याचा आरोप एडविन मास्कारेन्हस यांनी केला. चिखली पंचायतीने येथे झालेल्या सर्व प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी चिखली ग्रामविकास समितीने केली आहे. चिखली पंचायतीचे प्रभारी सरपंच कमला प्रसाद यादव यांनी सांगितले की दाबोळी भागाबरोबर चिखलीतील नागरिकांनी हा रस्ता रुंदी करण्याची अनेक वेळा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी केली होती. कारण पंचायत रस्ता रुंदीकरण संरक्षक भिंतीचे काम हे हाती घेऊ शकत नाही. या कामाला खूप पैसा लागतो. यासाठी हा रस्ता आमदार गुदिन्हो यांनी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागामार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार सध्या या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दाबोळीच्या विकासाल प्रथम स्थान देऊन चिखली पंचायतीने अनेक विकास कामांना चालना दिली असल्याची माहिती प्रभारी सरपंच यादव यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com