Goa: शिवनाथ बनला मित्राच्या आईसाठी देवदूत..!

Goa: महापुराच्या वेढ्यात बारा तास अडकलेल्या आईला मोठ्या शर्थीने दिली धीर
Goa: Shivnath Usapkar
Goa: Shivnath UsapkarDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : आपत्कालीनवेळी, कठीण प्रसंगावेळी, दुःखाच्या प्रसंगी खंबीरपणे उभा राहतो, प्रोत्साहन देतो, मदत करतो तोच खरा मित्र (True Friend) असतो. याचा प्रत्यक्ष अनुभव काही दिवसांपूर्वी सत्तरीत (Sattari - Goa) आलेल्या महापुरावेळी (Flood situation) आला. त्यावेळी पुरामुळे सर्वत्र पाणीच पाणी (Water) अशी स्थिती होती. अनेकजण मदतीला (Help) धावले, पण मदत केलेले समोर आले नव्हते. आता हळूहळू काही सामाजिक बांधिलकीने मदत केलेल्या लोकांच्या गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत.

बाराजण - सत्तरी येथील वडाकडे वास्तव्य करीत असलेल्या बाक्रे कुटुंबियांवर पुरावेळी मोठी समस्या निर्माण झाली होती. अरुण बाक्रे यांची आई रात्री घरी एकटीच होती व घराला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यावेळी गावातील शिवनाथ उसपकर याने अगदी जीवाचे रान करून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या बाक्रे यांच्या आईला मदत केली. याबाबत शिवनाथ उसपकर म्हणाले, २३ जुलै रोजी आपण झोपेत असताना पहाटे पाचच्या दरम्यान अरुण बाक्रे याचा अचानक फोन आला. त्याने आपली आई घरात एकटीच असून तिच्या पायांची शस्त्रक्रिया झाली आहे. घराच्या चारी बाजूने पाणी भरले आहे. त्यामुळे तिला बाहेर पडता येत नाही. तिला मदत कर असे सांगितले. त्यावेळी आपण मागचा पुढचा विचार न करता ताबडतोब बाक्रे यांच्या घराकडे धाव घेतली, पण वाटेतच रस्त्यावर पाणी आल्याने अडथळा आला. तसाच काळोखात आपण पुराच्या पाण्यातून पोहत पोहत बाक्रे यांच्या घरी पोचलो. त्यावेळी त्याची आई घराच्या गच्चीवर होती. कसाबसा पाण्यातून पोहत घराजवळ असलेल्या साहित्याचा आधार घेत गच्चीवर गेलो. तेव्हा साधारण पहाटेचे साडेपाच वाजले असतील. सकाळी ६.३० पर्यंत तिच्या सोबत थांबलो. तेव्हा पाणी घराजवळ बरेच वाढले होते. आई घाबरलेल्या स्थितीत होती. तिला धीर देत पुन्हा पुराच्या पाण्यातून वाट काढत जाऊन तिच्यासाठी चहा घेऊन आलो. दुपारपर्यंत मी तिच्या सोबत थांबलो. घाबरलेल्या मित्राच्या आईला बारा तास धीर दिला. शिवनाथ उसपकर हे बालभवन केंद्र नगरगाव येथे विद्यादान करीत आहेत. गावातील नागरिक किंवा मित्र कसा असावा हे शिवनाथ यांच्याकडून प्रत्येकाने शिकले पाहिजे. खरे तर अशा व्यक्तींचा गौरवही सरकारने किंवा संबंधितांकडून अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com