Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

Subhash Velingkar Marathi language Goa: मराठीला राजभाषा होणारच आहे, आमचा दृढ विश्‍वास आहे. त्यामुळे सरकारकडे आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतो आहोत, आणि तो मिळालाच पाहिजे, अन्यथा सत्ताधाऱ्यांचे काय होईल ते सांगता येणार नाही, अशा शब्दात प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Subhash Velingkar Marathi language Goa
Subhash Velingkar Marathi language GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा: मराठीला राजभाषा होणारच आहे, आमचा दृढ विश्‍वास आहे. त्यामुळे सरकारकडे आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागतो आहोत, आणि तो मिळालाच पाहिजे, अन्यथा सत्ताधाऱ्यांचे काय होईल ते सांगता येणार नाही, अशा शब्दात प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

फोंड्यातील किडस् नेस्टमध्ये आज रविवारी आयोजित मराठी निर्धार समितीच्या पणजीतील महामेळाव्यासंबंधीची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मेळावावजा बैठकीत सुभाष वेलिंगकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, महिला शक्तीच्या डॉ. अनिता तिळवे, दिवाकर शिंक्रे, गोविंद देव, शानुदास सावंत, मच्छिंद्र च्यारी, रामदास सराफ व जयवंत आडपईकर आदी उपस्थित होते.

Subhash Velingkar Marathi language Goa
Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

सुभाष वेलिंगकर म्हणाले, आम्हाला कोकणीबद्दल अजिबात द्वेष नाही, पण मराठीला तिचे मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही लढत आहोत, या लढ्याला यश हे हमखास मिळणारच आहे. आतापर्यंत राज्यात मेळावे, बैठका, सभा घेऊन मराठीची जागृती झाली आहे. पेडणेसारख्या पालिकेने मराठीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. इतरही पालिका, ग्रामपंचायती, संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे, त्यामुळे मराठीची बाजू भक्कम आहे. गो. रा. ढवळीकर म्हणाले की, मराठीला राजभाषेचे स्थान हे प्राप्त होणारच आहे. आतापर्यंतच्या लढ्याचे ते फलित असून राष्ट्रपतींनाही साकडे घालण्यात येणार आहे, त्यातूनच मराठीप्रेमींचा जय होईल, असे ढवळीकर म्हणाले.

Subhash Velingkar Marathi language Goa
Marathi Language: मराठी राजभाषा निर्धार समितीची बैठक; बुद्धिजीवींसह व्यावसायिकांच्या सह्यांचे निवेदन सरकारला देणार, स्नेहमेळाव्यात निर्धार

...तर भाजपचे अधःपतन

मराठीला नाकाराल, तर मागच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जसा अनुभव आला तसा आताच्या सत्ताधाऱ्यांना येणार असून सत्ताधारी अर्थातच भाजपचे अधःपतन होईल, असा दावा प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला. कोकणी प्रजेचो आवाजने त्यावेळी दंगल घडवून आणली, अनिष्ट घडवले, पण मराठीप्रेमी ठाम राहिले. भाजपला (BJP) मुळात इच्छाशक्ती नसल्याचे जाणवत असून अधःपतन नको असेल तर मराठीला राजभाषेचे स्थान द्या, असा इशाराही वेलिंगकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.