Marathi Language: मराठी राजभाषा निर्धार समितीची बैठक; बुद्धिजीवींसह व्यावसायिकांच्या सह्यांचे निवेदन सरकारला देणार, स्नेहमेळाव्यात निर्धार

Marathi Official Language Goa: मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला फोंड्यातील बुद्धिजीवी तसेच नामवंत मंडळी उपस्थित होती.
Marathi Official Language Goa
Marathi LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मराठीला मानाचे स्थान डावललेल्या सरकारकडे शेवटचा पर्याय म्हणून राज्यातील मराठीच्या अठराही प्रखंडातून नामवंत व्यावसायिक तसेच बुद्धिजीवींच्या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्री, आमदारांना देण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना मराठीप्रेमींकडून तात्काळ इमेल पाठवण्याचा निर्णय मराठी सद्‌भावना मिलन कार्यक्रमात झाला.

यावेळेला सरकारने उदासीनता दाखवली, तर भाजप सरकारला खाली खेचण्याची धमक दाखवूया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. हा स्नेहमीलन कार्यक्रम खडपाबांध - फोंड्यातील विश्व हिंदू परिषद सभागृहात झाला.

Marathi Official Language Goa
Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला फोंड्यातील बुद्धिजीवी तसेच नामवंत मंडळी उपस्थित होती. यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष वेलिंगकर, मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, कमलाकर साधले, जयंत मिरिंगकर, डॉ. अनिता तिळवे, डॉ. नूतन देव, डॉ. दत्ताराम देसाई, रामदास सराफ व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मराठीचा लढा करणार तीव्र!

राज्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि इतर क्षेत्रात मराठीला मोठे महत्त्व आहे. गोव्याची राजभाषा ही खरी मराठीच आहे, पण कोकणीसह मराठीही राजभाषा करावी अशी आमची मागणी आहे. आत्तापर्यंत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न झाला, पण राजकारण्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा कार्यक्रम केला. बहुतांश मराठीप्रेमी हे भाजप समर्थक मतदार असून मराठीला राजभाषा करण्याची ही निर्णायक वेळ असून कदाचित पुढील चार महिन्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून यावेळेला मराठीला राजभाषा करण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करूया असा निर्धार या स्नेहमेळाव्यात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Konkani Marathi Language Dispute
Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry
Subhash Velingkar Marathi Language Goa
Esakal No. 1 Marathi Website
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com