कुडचडेत केवळ देवदर्शनासाठी, माझ्यासोबत समर्थक अथवा कार्यकर्ते नव्हते! साध्या भेटीचा राजकीय अर्थ काढून विपर्यास; फळदेसाईंचे स्पष्टीकरण

Subhash Phal Dessai Curchorem visit: साध्या भेटीचा राजकीय अर्थ काढून विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी दिले.
Subhash Phal Dessai Curchorem visit
Subhash Phal Dessai Curchorem visitDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: शनिवारी कुडचडे येथे मी केवळ देवदर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत कुडचडेतील समर्थक अथवा कार्यकर्ते कुणीही नव्हते. मात्र, या साध्या भेटीचा राजकीय अर्थ काढून विपर्यास करण्यात आला, असे स्पष्टीकरण सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी दिले.

सांगे मतदारसंघातील जनतेने आणि मतदारांनी जी भूमिका ठरविली आहे, ती मला मान्य असेल, असे स्पष्ट करत फळदेसाई यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा निर्णय सांगेतील जनतेच्या भूमिकेवर सोपविला आहे.

कुडचडेतील देवदर्शनामुळे सांगे मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे आज ते मला जाब विचारण्यासाठी आले होते. त्यांना जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण त्यांना मी कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे वाटले.

Subhash Phal Dessai Curchorem visit
Goa Congress: काणकोणमध्ये काँग्रेसला 'बळ', 'दया' गावकरांसह समर्थकांचा प्रवेश; पक्षसंघटना मजबूतीवर भर

मात्र, तसे काहीही नसल्याचे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे, असे फळदेसाई म्हणाले. माझ्या कुडचडे भेटीबाबत काही पत्रकारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना विचारले असता त्यांनी ‘फळदेसाई यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे सांगितल्याचे समोर आले. या विधानामुळे फळदेसाई यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र, मी समर्थकांना समजावून सांगितल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

सांगेतील जनतेने मला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. त्यामुळे मला जाब विचारण्याचा अधिकार त्यांना आहे. माझ्या मतदारांना काही शंका असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असेही फळदेसाई म्हणाले.

Subhash Phal Dessai Curchorem visit
Goa Politics: काहींवर सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण, नाव न घेता विरोधी पक्षनेत्यावर विजय सरदेसाईंची तोफ

१९९६ पासून सांगेत काम

१९९६ मध्ये जेव्हा सांगे भागात भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता, तेव्हापासून त्यांनी पक्षाचे काम सुरू केले आणि हजारो सदस्यांची नोंदणी केली. गोव्याव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महिने न महिने घरापासून दूर राहून पक्षाचे काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com