Ratnagiri Crime: स्वप्नात येणाऱ्या 'त्या' व्यक्तीच्या शोधात मी निघालोय, सिंधुदुर्गातील तरुणाचा Video समोर
Sindhudurg RatnagiriDainik Gomantak

Ratnagiri Crime: स्वप्नात येणाऱ्या 'त्या' व्यक्तीच्या शोधात मी निघालोय, सिंधुदुर्गातील तरुणाचा Video समोर

Ratnagiri Crime Case: पोलिसांनी भोस्ते घाटातील जंगलात पाहणी केली असता त्यांना अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे.
Published on

रत्नागिरी: खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी आढळून आल्याची घटना 18 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेबाबत सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील एका तरुणाला स्वप्न पडल्याचे तरुणाने खेड पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपासणी केली असता तरुणाचा दावा खरा ठरल्याने प्रकरणातील रहस्य वाढले आहे.

दरम्यान, घटना उघडकीस येण्यापूर्वी तरुण स्वप्नातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी निघाला होता त्याचे काही व्हिडिओ समोर आलेत.

आर्याने त्याच्या Instagram Account वरती विविध व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात तो खेडमध्ये दाखल झाल्याचे सांगत आहे. मी पहाटे सव्वा चार वाजता खेड रेल्वे स्थानकावर आलो, मला आज जंगलाची सफर करायचीय. माझ्या स्वप्नात येणारी ती व्यक्ती कदाचित मला भेटेल, असे आर्या त्याच्या व्हिडिओ बोलताना दिसत आहे.

तसेच, तो भोस्ते घाटातील त्याच्या स्वप्नात आलेल्या दृष्यांचा देखील व्हिडिओत उल्लेख करताना दिसत आहे.

काहीतरी ट्विस्ट असेल!

यापूर्वी देखील आर्याने काही व्हिडिओ शेअर केलेत त्यात तो सावंतवाडी रेल्वे स्थानकावर दिसत आहे. सहा दिवस रस्त्याने प्रवास केल्यानंतर आता मी जंगलातून प्रवास करणार असल्याचे तो सांगत आहे. हा प्रवास थोडा आव्हानात्मक आणि धोकादायक असेल पण हा थोका मला पत्कारावा लागेल, असे आर्या त्याच्या व्हिडिओ म्हणत आहे.

Ratnagiri Crime: स्वप्नात येणाऱ्या 'त्या' व्यक्तीच्या शोधात मी निघालोय, सिंधुदुर्गातील तरुणाचा Video समोर
हॉटेलमध्ये झाली मैत्री, लग्नाचे आमिष देऊन केला लैंगिक अत्याचार; गोव्याच्या तरुणाला छत्तीसगड येथे अटक

आर्याचा याच क्षेणीतील आणखी एक व्हिडिओ असून, तो पहाटेच्या सुमारास त्याच्या स्वप्नाची माहिती देताना दिसत आहे. स्वप्नात येणाऱ्या व्यक्ती आणि जागेबाबत काही क्ल्यू मिळाल्याचे तो या व्हिडिओत सांगताना दिसत आहे.

दरम्यान, योगेश पिंपळ आर्या (३०) या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील तरुणाने खेड पोलिस ठाण्यात डोंगरात पुरुषाचे प्रेत असून, तो माझ्या स्वप्नात येऊन मदत करा असे विनंती करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

पोलिसांनी भोस्ते घाटातील जंगलात पाहणी केली असता त्यांना अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे. तसेच, मृतदेहापासून ५ फुटावर एक कवटी सापडलीय. मृतदेहाच्या ओळखीचा कोणताच पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यात तरुणाने दिलेला स्वप्नाचा संदर्भ यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे. दरम्यान, ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com