Goa Budget Session 2023 : खोर्ली औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवरून जोरदार वाद; माविन-फळदेसाई आमनेसामने

उद्योगमंत्र्यांकडून चुकीची माहिती दिल्याचा दावा; माविनला घरचा आहेर
mauvin godinho-rajesh phaldesai face off
mauvin godinho-rajesh phaldesai face offDainik Gomantak
Published on
Updated on

खोर्ली औद्योगिक वसाहतीतील उद्योगांसमोर समस्या वाढत असतानाच यावरून उद्योगमंत्री माविन गुदिन्हो आणि भाजपचे आमदार राजेश फळदेसाई यांच्यात चांगलीच जुंपली.

एकप्रकारे मंत्री गुदिन्हो यांना हा घरचा आहेर होता. मंत्री चुकीची माहिती देत आहेत, असे आमदार फळदेसाई सभागृहात म्हणाले, तर मंत्र्यांनी यावर पलटवार करत सरकारची माहिती खरी असल्याचा दावा केला.

खोर्ली औद्योगिक वसाहतींच्या समस्यांवरून मंत्री गुदिन्हो आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार फळदेसाई यांच्यात चांगलाच वाद रंगला.

आतापर्यंत विरोधकांनी विचारलेले प्रश्न जास्त गांभीर्याने घेतले जायचे. आता सत्ताधारी पक्षाचे आमदारच मंत्र्यांना कोंडीत पकडत असल्याने मंत्रीही वैतागलेले दिसत आहेत. फळदेसाई यांनी आपल्या मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीतील समस्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.

mauvin godinho-rajesh phaldesai face off
Goa Budget Session 2023 : विधवांच्या संरक्षणाबाबत सरकार गंभीर : विश्वजीत राणे

फळदेसाई म्हणाले, मी मंत्री गुदिन्हो यांना या औद्योगिक वसाहतीबद्दल काही विनंत्या केल्या होत्या.

मात्र, त्यांनी त्या ऐकल्या नाहीत. हा प्रकार मी भाजपच्या केंद्रीय नेत्याच्या कानावर घातला. त्यामुळे मंत्री गुदिन्हो माझ्यावर नाराज असावेत. मी आमदार म्हणून अनेक कामे करत आहे.

मात्र, 3 फेब्रुवारी रोजी मंत्री गुदिन्हो यांनी येथे मला न सांगता बैठक घेतली. यामध्ये त्यांनी मी सांगितलेल्याच सूचना परत केल्या. हे सोडून खोर्ली औद्योगिक वसाहत समस्यामुक्त करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. यावर मंत्री गुदिन्हो म्हणाले की, माझा कुणावरही राग नाही.

रोजगार आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन द्या

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी डिचोली, लाटंबार्से येथील औद्योगिक वसाहती सुरू नसल्याने खोर्ली औद्योगिक वसाहतीला चालना देऊन स्थनिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी केली. तर आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी येथे बचत गटांना आणि सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना जागा देऊन छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली.

mauvin godinho-rajesh phaldesai face off
Yuri Alemao: सत्ताधारी आमदारांनीच सरकारला दाखवला आरसा; विरोधी पक्षनेत्यांनी केले कौतूक

21 नव्हे 70 उद्योग बंद

मंत्री गुदिन्हो यांनी खोर्ली औद्योगिक वसाहतीतील 21 युनिट बंद तर 86 सुरू असल्याचे सांगितले. यावर आमदार फळदेसाईंनी आक्षेप घेत मंत्री चुकीची माहिती सांगत असल्याचे म्हणत खोर्लीतील 70 उद्योग बंद असल्याचे सभागृहात सांगितले.

"खोर्लीमधील काम पाहण्यासाठी ती एक अचानक दिलेली भेट होती. येथे खात्यातर्फे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन, कंपाउंड भिंत बांधणे, सांडपाणी व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे. ही कामे मेअखेरीस पूर्ण होतील. येथील काही जमीन हस्तकला मंडळाकडे विनावापर पडून आहे. ती परत मिळाल्यास अन्य उद्योगांसाठी वापरता येईल."

- माविन गुदिन्हो, उद्योगमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com