Goa Postmen Controversy: गोव्यातील 49 पोस्टमन काढले, त्याजागी महाराष्ट्रीयन भरले; अन्यायाविरुद्ध सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Postmen Replaced: फातोर्डा येथील लोकांच्‍या समस्‍या कथित करताना सरदेसाई म्‍हणाले, नवनियुक्त पोस्टमनना गोव्यातील पत्त्यांचे ज्ञान आणि स्थानिक भाषा या दोन्हीची ओळख नाही.
Goa Postmen Controversy
Postmen replacement in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दीर्घकाळ टपाल खात्‍यात काम केलेल्‍या गोव्‍यातील अनुभवी ४९ पोस्‍टमनच्‍या जागी महाराष्‍ट्रातील पोस्‍टमनची नियुक्‍ती केल्‍याने एक तर गोवेकरांवर अन्‍याय होत आहेच, शिवाय बाहेरून आलेल्‍या या पोस्‍टमनना गोव्‍यातील पत्ते कळत नसल्‍याने लोकांना त्‍यांची पत्रेही मिळत नाहीत, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

यासंबंधी तातडीने उपाय घेतले नाहीत, तर हा विषय आपण विधानसभेत चर्चेत आणून आवाज उठविणार, असे त्‍यांनी सांगितले.

‘मला विश्वासार्ह माहिती मिळाली आहे, की महत्त्वाची पत्रे, विशेषतः महसूल कार्यालयांमधून पाठवलेली पत्रे, फोंडासारख्या भागातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, चौकशी केल्यानंतर ४९ गोव्यातील पोस्टमनना काढून टाकण्यात आले आणि त्यांच्या जागी महाराष्ट्रातील पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे’, असे सरदेसाई यांनी सांगितले.

फातोर्डा येथील लोकांच्‍या समस्‍या कथित करताना सरदेसाई म्‍हणाले, नवनियुक्त पोस्टमनना गोव्यातील पत्त्यांचे ज्ञान आणि स्थानिक भाषा या दोन्हीची ओळख नाही. फातोर्डा येथील अंबाजी परिसरात नियुक्त केलेल्या अशा एका पोस्टमनला कोकणी किंवा इंग्रजीही येत नाही. या भागात अनेक अनुसूचित जमाती समुदायाची कुटुंबे आहेत, जिथे अनेक वृद्ध रहिवासी आहेत ज्यांना हिंदी समजत नाही त्यांनी कसा संवाद साधावा?

Goa Postmen Controversy
Ponda Post Office Chaos: 'सीएम साहेब' आता तुम्हीच लक्ष घाला! 'पत्रं' वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय

‘आश्वासनाची एक वर्षानंतरही पूर्तता नाही’

मागच्‍या विधानसभा अधिवेशनात मी हा प्रश्न विचारला होता, त्‍यावेळी यापुढे गोव्‍यात पोस्‍टमनचे काम करणाऱ्यांना कोकणी समजणे सक्‍तीचे केले जाईल, असे आश्वासन मुख्‍यमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्‍या आश्वासनाची अजूनही पूर्तता झालेली नाही. भविष्‍यात उपाययोजना केली तरी आता त्‍यामुळे ज्‍यांची नोकरी गेली आणि ज्‍यांना पत्रे मिळत नसल्‍याने त्रास सोसावे लागतात त्‍यांचे काय असा सवाल करून या डबल इंजिन सरकारचे इंजिन घसरले आहे की काय असा सवाल सरदेसाई यांनी केला.

Goa Postmen Controversy
Viral Post: गैरवर्तन भोवलं! सोमवारी कामावर घेतलं शुक्रवारी हाकलंल; गोव्यातील कंपनी संस्थापकाचे होतंय कौतुक

‘साप्‍ताहिक दरबारा’त नागरिकांचे गाऱ्हाणे

फातोर्डा येथील ‘गोंयकार घरा’त सरदेसाई यांनी आज लोकांच्‍या समस्‍या ऐकून घेण्‍यासाठी ‘साप्‍ताहिक दरबार’ आयोजित केला होता. यावेळी काही लोकांनी बिगर गोमंतकीय पोस्‍टमनांमुळे त्‍यांना होणारा त्रास याबद्दल त्‍यांच्‍याकडे गाऱ्हाणे मांडले. सरकारी कार्यालयातून आलेल्‍या सूचना त्‍यांच्‍यापर्यंत न पोहोचविल्याबद्दल किंवा विलंबाने पोचवल्याबद्दल गोव्यातील लोकांना जे त्रास होतात याकडे त्‍यांचे लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com