पणजी : मंत्री विश्वजीत राणेंना अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअप मेसेज पाठवून त्रास दिला जात असल्याची माहिती आता समोर येत आहे. विश्वजीत राणे यांनी गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडे त्याची रितसर तक्रारही दाखल केली आहे. 9919216683 या नंबरवरुन आपल्याला व्हाट्सअप मेसेज पाठवून अज्ञाताकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार दाखल केल्याचं राणेंनी स्पष्ट केलं आहे. तसंच अशाप्रकारे अन्य कुणाला त्रास दिला जात असल्यास त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचं आवाहन विश्वजीत राणेंनी केलं आहे.
विश्वजीत राणे यांनी ट्विट करत या प्रकाराची माहिती दिली आहे. आपल्याला अज्ञाताकडून अनोळखी नंबरच्या माध्यमातून व्हॉट्सअपवर त्रास दिला जात आहे. 9919216683 या नंबरवरुन तोतयाकडून त्रास दिला जात असून आपण याची माहिती पोलिस महासंचालकांना दिल्याचं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसंच याप्रकरणी चौकशी करण्याची विनंती केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर घातल्याच्या आरोपावरून मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या रुमडामळ-दवर्ली येथील पंचायत निवडणुकीतील उमेदवार उर्मिन पठाण याला मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयाने 150 हजारांच्या जामिनावर मुक्त केले.
आपल्याला पंचायत निवडणुकीत प्रभाग 8 मधून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे विरोधक हादरले असून, त्यामुळेच आपल्या विरोधात खोटी केस करून आपल्याला अटक केली, असा आरोप पठाण याने केला. भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांच्याविरोधात तो निवडणूक लढवत आहे. उमेदवारी मागे घ्यावी यासाठी याआधीही आपल्याला धमक्या आल्या होत्या, असे त्याने सांगितले. पठाण यांचे वकील प्रशांत बोरकर यांनी आपल्या अशिलावर दाखल केलेला गुन्हा राजकीय वैमनस्यातून असल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात तक्रारीत जे आरोप केले आहेत त्यांचे स्पष्टीकरणही दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.