St. Xavier Feast: ओल्ड गोवा फेस्तमुळे फोंडा-पणजी मार्गावर मोठे बदल, वाहतुकीचे नवे नियम लागू; पर्यायी मार्ग कोणते?

Old Goa traffic changes: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या 'नोव्हेना' आणि 'फेस्त' या कार्यक्रमांसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत मोठे बदल केले
St Xavier Feast Goa
St Xavier Feast GoaDainik Gomantak
Published on
Updated on

St Xavier Feast Old Goa traffic update: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेष दर्शनाच्या निमित्ताने ओल्ड गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'नोव्हेना' आणि 'फेस्त' या कार्यक्रमांसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. दि. २४ नोव्हेंबर, २०२५ ते ३ डिसेंबर, २०२५ या कालावधीत ओल्ड गोवा परिसरात होणाऱ्या या सोहळ्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष वाहतूक व पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

पणजी-ओल्ड गोवा मार्गावर खास व्यवस्था

पणजीहून ओल्ड गोवा येथे येणाऱ्या वाहनांसाठी दोन मुख्य मार्गांवर महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

१. रायबंदर मार्गे (Via Ribandar):

विशेष बस: पणजीहून रायबंदर मार्गे ओल्ड गोव्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष बस सोडल्या जातील. या बस धेंम्पो इंजिनिअरिंग येथे डावीकडे वळून बचिया बस स्टँडवर पार्क केल्या जातील.

दोन/चारचाकी: दुचाकी आणि चारचाकी वाहने धेम्पो इंजिनिअरिंगजवळ डावीकडे वळून बचिया प्रॉपर्टीमध्ये पार्क करावी लागतील.

विकलांग/आजारी: 'सिक/दिव्यांग कार पास' असलेली वाहने दिवजा सर्कल येथून कदंब बायपास, ओल्ड नेवरा जंक्शनमार्गे ओल्ड गोवा पंचायतजवळच्या सुलभ शौचालयसमोरच्या मोकळ्या जागेत पार्क केली जातील.

St Xavier Feast Goa
St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

२. कदंब बाय-पास मार्गे (Via Kadamba By-Pass):

पणजी-फोंडा बस: पणजी ते फोंडा मार्गावरील बस रायबंदरमार्गे न जाता, केटी सर्कल येथून कदंब बाय-पास (NH-748) मार्गे वळवण्यात येतील.

वाहतूक व्यवस्था: दुचाकी व चारचाकी वाहने व्यंकटेश पेट्रोल पंपजवळ डावीकडे वळून सेंट मोनिका ननरीमार्गे, सेंट ऑगस्टीन टॉवर जंक्शनवरून बचिया प्रॉपर्टीमध्ये पार्किंगसाठी जातील.

अतिरिक्त पार्किंग: एनएच-७४८ (NH-748) बाजूला, माजी आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या निवासस्थानापूर्वी विकसित केलेल्या मोकळ्या जागेतही पार्किंगची सोय आहे.

३. दक्षिण गोवा आणि फोंडा मार्गासाठी नियम

दक्षिण गोवा आणि फोंडा भागातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहतुकीचे नियम कठोर करण्यात आले आहेत.

दक्षिण गोवा: पिलार ते ओल्ड गोवा रस्ता 'वन-वे' राहील. ओल्ड गोव्यातून कोणतेही वाहन नेवरामार्गे परत जाणार नाही; त्यांना NH-748 मार्गे एक्झिट घ्यावी लागेल.

पार्किंग: दुचाकी/चारचाकी वाहने एला फार्म आणि ॲनिमल हसबंड्री परिसरात पार्क केली जातील.

बस: नेवरामार्गे येणाऱ्या बस एला फार्म मेन गेटजवळ डावीकडे वळून कुंकळकर स्कूल ग्राऊंड बस स्टँडवर पार्क केल्या जातील.

फोंडा: फोंड्याहून येणाऱ्या दुचाकी/चारचाकी वाहने पिंटो गॅरेजमागे पार्क होतील.

फोंडा-पणजी बस: या बस ओल्ड गोवा चर्च कॉम्प्लेक्समार्गे न जाता नेवरा जंक्शन येथून कदंब बायपासने वळवण्यात येतील.

४. व्हीआयपी, पुजारी आणि अत्यावश्यक वाहनांसाठी खास सोय

व्हीआयपी: ओल्ड गोवा पोलीस स्टेशनच्या आवारात.

पुजारी: बसिलिका ऑफ बॉम जीझसच्या मागील कंपाउंडमध्ये.

आजारी/विकलांग: सुलभ शौचालय समोर आणि ओल्ड गोवा पंचायत आवारात.

इतर व्यवस्था: ओल्ड गोवा चर्च जंक्शन ते गांधी सर्कल दरम्यानचा रस्ता केवळ आपत्कालीन वाहनांसाठी (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल) बंद राहील. तसेच, चर्च जंक्शन ते सेंट कॅथरीन चॅपल मार्गे दिवाळ फेरीकडे जाणारा रस्ता 'वन-वे' राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com