ST Reservation: एसटी आरक्षणाविषयी रामदास आठवले भाजपच्या मनातीलच बोलले; एल्विस गोम्स यांची टीका

आरक्षण जाहीरपणे नाकारणे दुर्दैवी
Elvis Gomes on Ramdas Athawale
Elvis Gomes on Ramdas Athawale Dainik Gomantak
Published on
Updated on

Elvis Gomes on Ramdas Athawale: गोव्यातील अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाला राजकीय आरक्षण जाहीरपणे नाकारण्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी व्यक्त केली आहे.

एसटी आरक्षणासंबंधी विधानसभेत ठराव घेण्यात आलेला असून या संबंधी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेले असल्याने आठवले यांच्या वक्तव्यावर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी गोम्स यांनी केले आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गाला राजकीय आरक्षण देण्याची भाजपचीच मनापासून इच्छा नाही. त्यामुळे आठवले यांचे हे वक्तव्य एकापरीने बरोबर असू शकते. भाजपच्या जे मनात आहे, एसटी आरक्षणाविषयी भाजपचे जे धोरण आहे तेच आठवले यांनी व्यक्त केले आहे, अशी उपरोधिक टीका गोम्स यांनी केली आहे.

Elvis Gomes on Ramdas Athawale
Calangute: कळंगुटमध्ये खड्ड्यांवरून जुंपली; PWD च्या मते रस्त्यात खड्डे नाहीत, तर सरपंच म्हणतात खड्डे आहेत...

भाजपने आजपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गाची केवळ फसवणूकच केली आहे. काहीही केले तरी भाजपची ही मानसिकता बदलता न येणारी आहे, असे गोम्स यांनी सांगितले.

अनुसूचित समाजाच्या राजकीयआरक्षणासंबंधी विधानसभेत ठराव घेतला होता. असाच एक ठराव यापूर्वी गोव्याला खास राज्याचा दर्जा मिळावा म्हणूनही विधानसभेत घेण्यात आला होता. भाजपची गोव्यात बारा वर्षे तर केंद्रात दहा वर्षे राजवट असूनही या ठरावाचे काहीच झाले नाही.

त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या ठरावालाही काही अर्थ राहात नाही. भाजपची ही बनवेगीरी आठवले यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे उघड झाली आहे, असे मत गोम्स यांनी व्यक्त केले.

Elvis Gomes on Ramdas Athawale
गोव्याचे काजू, नारळ हरियाणात विकणार; हरियाणाची फळे, भाजीपाला गोव्यात पाठवणार...

गोवा प्रदेश काॅंग्रेसच्या एसटी विभागाचे अध्यक्ष जोजफ वाझ, योगेश नागवेकर यांनीही या विषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आठवले यांचे वक्तव्य गोमंतकियांची दिशाभूल करणारे आहे. या विषयावर बोलण्यापूर्वी आठवले यांनी भाजपच्या एसटी मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. जनगणनेनुसार एसटीची लोकसंख्या 1 लाख 53 हजार आहे.

असे असताना एसटीची लोकसंख्या अल्प असल्याचे वक्तव्य मंत्री आठवले कसे करू शकतात असा सवाल वाझ यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com