Calangute: कळंगुटमध्ये खड्ड्यांवरून जुंपली; PWD च्या मते रस्त्यात खड्डे नाहीत, तर सरपंच म्हणतात खड्डे आहेत...

रस्ते दुरूस्तीत पारदर्शीपणा ठेवण्याची स्थानिकांची मागणी
Calangute Potholes in Road:
Calangute Potholes in Road:Dainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Potholes in Road: कळंगुट ते बागा या परिसरातील रस्त्यांच्या खराब स्थितीवरून कळंगुट पंचायतीने आरोप केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कळंगुटमध्ये रस्त्यात खड्डे नाहीत, असे म्हटले आहे तर कळंगुटचे सरपंच मात्र कळंगुटमधील रस्त्यांवर खड्डे असल्याचे म्हटले आहे.

या विरोधाभासी वक्तव्यांमुळे कळंगुटमध्ये खड्डे आहेत की नाहीत, असा सवाल विचारला जात आहे. कळंगुटमधील रस्त्यातील खड्ड्यांचे व्हिडिओ या निमित्ताने व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले जात आहेत.

Calangute Potholes in Road:
ST Reservation: केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री सावंत यांनी माफी मागावी...

दरम्यान, कळंगुटमधील नागरिकांनीही रस्ता दुरूस्तीच्या कामात पारदर्शकपणा आणावा, अशी मागणी केली आहे.

कळंगुटच्या ग्रामस्थांनी रस्त्यांच्या स्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी पॅचवर्क आणि खड्डे भरण्याच्या कामात सिमेंटचा वापर केला गेला आहे. पण ते पुरेसे नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ तात्पुरती मलमट्टी केली आहे. पण या समस्येवर कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळासाठीचा उतारा गरजेचा आहे. अधिक ठोस कृती गरजेची आहे, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

रस्त्यांची स्थिती आणि दुरूस्तीबाबतची स्थिती याबाबत सविस्तर अहवाल द्यावा, अशी विनंती ग्रामस्थांनी PWD ला केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com