Panaji News : सांतिनेजच्या ‘चिखलातून’ महापालिकेचा काढता पाय

मलनिस्सारण विभागावर ढकलली जबाबदारी
st inez panjim
st inez panjimDainik Gomantak
Published on
Updated on

सांतिनेजमध्ये मलनिस्सारण वाहून घेऊन जाणारी नवी मोठ्या व्यासाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यातच गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता चिखलमय झाला आहे. या चिखलाला जे काम करीत आहे, ते खाते कारणीभूत आहे. या खात्यानेच ती समस्या सोडवावी, असा पवित्रा घेत महानगरपालिकेने या चिखलाच्या समस्येतून हात वर केल्याचे दिसते.

नव्याने वाहिनी टाकण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी चेंबर ऩिर्माण केले जात आहेत. त्या चेंबरसाठी रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले आहेत. त्या खड्ड्यांत यापूर्वीच्या असलेल्या चेंबरमधून सांडपाणी भरलेले असून, त्यात डासांची पैदास होण्याची भीती वाढली आहे.

पणजीत स्मार्ट सिटी, सार्वजिक बांधकाम खात्याचे अभियंता, नगरविकास खत्याच्या अभियंत्यांना बैठकीसाठी बोलविणार आहेत. सांतिनजेमधील या समस्येवर तोडगा कसा काढता येईल ते पाहावे लागणार आहे.

st inez panjim
Canacona News : ‘साबांखा’च्या कक्षाला टाळे ठोकल्याने दोघांवर गुन्हा दाखल

काब्राल म्हणाले...

  • पणजीत १९७६ मध्ये मलनिस्सारणाची घातलेली वाहिनी अनेक ठिकाणी कालबाह्य झाली आहे. राज्य नगरविकास खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून परवानगी घेऊन मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू केले. तत्कालीन साबांखा मंत्र्यांनी त्यास ना हरकत दाखला दिला होता. आम्ही फक्त पर्यवेक्षक म्हणून काम करीत आहोत.

  • आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला नवे तंत्रज्ञान घेण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील पाण्याचे नमुने नेलेले आहेत. याबाबत संबंधित मंत्र्यांनी लक्ष घालून त्यात काय वेगळे करता येईल ते पाहणे आवश्‍यक आहे.

st inez panjim
Theft in Mapusa Temple: म्हापशाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी; चांदीच्या शिवलिंगासोबतच इतर वस्तू लंपास

बुधवारी घेणार बैठक : काब्राल

पणजीतील काम हे काम जीसुडा करीत आहे. त्याशिवाय त्यांचा कंत्राटदारही आमच्याकडून सल्ले घेत नाही. हा विषय सुटण्यासाठी त्याबाबत बुधवारी (ता. ३ मे) आपण बैठक बोलाविली आहे. या बैठकीसाठी स्मार्ट सिटी, जीसुडा, साबांखा खाते तसेच त्यांचे व आमचे सल्लागार उपस्थित राहणार आहेत.

वाईट काही झाले की आमच्यावर विषय ढकलून मोकळे होतात. चांगले झाले की कोणी काही बोलत नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com