Canacona News : ‘साबांखा’च्या कक्षाला टाळे ठोकल्याने दोघांवर गुन्हा दाखल

काणकोण पोलिसांनी तक्रार गुन्हेगारी गुन्हा म्हणून केली नोंद
Janardhan Bhandari, Vikas Bhagat
Janardhan Bhandari, Vikas BhagatDainik Gomantak
Published on
Updated on

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हमरस्ता विभागाच्या कक्षाला टाळे ठोकल्याने जनार्दन भंडारी व विकास भगत अन्य दोघांवर या विभागाचे साहाय्यक अभियंता दिलीप केरकर यांनी काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काणकोण पोलिसांनी ही तक्रार गुन्हेगारी गुन्हा म्हणून नोंद केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सतावणे व सरकारी कामकाज करताना अडथळा आणणे यासंदर्भात हा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे काणकोणचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

Janardhan Bhandari, Vikas Bhagat
Theft in Mapusa Temple: म्हापशाच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी; चांदीच्या शिवलिंगासोबतच इतर वस्तू लंपास

गुळे येथे हमरस्त्यावर अपघातांची शृंखला चालू असताना हमरस्ता विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. या रस्ता अपघातांना निष्क्रिय हमरस्ता विभागाचे साहाय्यक अभियंता व अन्य कर्मचारी जबाबदार आहेत, असा आरोप करत भंडारी व भगत यांनी बुधवारी (ता.26) सकाळी साहाय्यक अभियंत्यांच्या कक्षाला कर्मचारी कक्षात असताना कुलूप लावले.

मागाहून पोलिस निरीक्षकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कुलूप काढण्यात आले. श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील रस्त्याच्या डांबरीकरणाची निविदा पास होऊनही राजकीय दबावामुळे कामाची वर्क ऑर्डर कंत्राटदाराला देण्यात येत नाही, यासाठी या पंचायतीचे पंच रामू नाईक उपोषणाला बसले होते. त्याला भंडारी व भगत यांनीही पाठिंबा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com