Sanit Francis Xavier Exposition
तिसवाडी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र पार्थिवाचे प्रदर्शन २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून देश- विदेशातून भाविक जुने गोवेत येणार आहेत. यात पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन यूके आणि इतर युरोपीय देशात स्थायिक झालेले २० हजारांहून अधिक गोमंतकीय प्रदर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
जुने गोवे येथे देशी-विदेशी भाविकांसाठी खास पार्किंग, शौचालय, वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. सगळीकडे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षितेसाठी खास पोलिस तैनात करण्यात आले आहेत. फोंडा, मडगाव, वास्को, पणजीहून ये-जा करणाऱ्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड देशातून मोठ्या संख्येने गोमंतकीय उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, जर्मनी आणि इतर देशांत सुद्धा गोमंतकीय आहेत. ते सर्वजण उद्यापासून जुने गोवेत दाखल होण्याची शक्यता आहे. बहुतांश जणांनी हवाई प्रवासाचे तिकिट आरक्षित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डिसेंबर सुट्टीचा हंगाम असल्याने तिकिट्सचे दर आभाळाला भिडतात. यासाठी पूर्व तयारी करून गोमंतकीय सज्ज झाले आहेत.अनेक जण लहान असताना त्यांचे पालक गोवा सोडून युरोपमध्ये स्थायिक झाले आहेत.
२०१४ नंतर जन्म झालेल्या मुलांसाठी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे पहिले प्रदर्शन असणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये वेगळाच उत्साह आहे. विविध ठिकाणी वॉच टॉवर, वाळूचे बंकर, प्रत्येक प्रवेश गेटवरती मेटल डिटेक्टर, महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाचे कमांडो तैनात केले आहेत.
जुने गोवेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुमारे एक हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ४०० सीसीटीव्ही कॅमेरे, अत्याधुनिक ड्रोन आणि एटीएस कमांडोची सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कौशल यांनी दिली.
जुने गोवे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत तिसवाडी उपअधीक्षक सुदेश नाईक आणि जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर उपस्थित होते. सकाळ, सायंकाळ आणि रात्री पोलिस काम करणार आहेत.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवाचे प्रदर्शन आजपासून सुरू होणार असून जुने गोवे आणि सभोवतीचा परिसर या महासोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत. सकाळी ९ वा. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र पार्थिव बाहेर काढले जाईल.
त्यानंतर बासिलिका ऑफ बॉम जिझस चर्चमधून ते से केथड्रल चर्च परिसरात नेऊन विशेष उभारलेल्या तंबूत ठेवले जाईल. पार्थिवाची पेटी उचलण्यासाठी गोवा पोलिस खात्याचे २० निरीक्षक नेमले गेले आहेत.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी यूकेतील गोमंतकीय आतुर आहेत. प्रदर्शनासाठी विमान तिकिटे कमी दरात मिळवण्यासाठी अगोदर बुकींग केले आहे. यूके मधील मुले सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक आहेत.
काही मुले प्रथमच प्रदर्शनाचा अनुभव घेणार आहे. गोमंतकीय समुदाय म्हणून सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे चमत्कारीक अस्तित्व यूकेमध्ये प्रसिद्ध आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.