St. Xavier Exposition: पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; ठावठिकाणा जाहीर न करण्याचा गृह मंत्रालयाचा आदेश

Saint Francis Xavier Exposition 2024 Pakistani Pilgrims: पाकिस्तानी गोमंतकीयांना इतर देशांतून भारतात यावे लागते. हे अधिक वेळखाऊ ठरते आणि खर्चही दुपटीने वाढतो.
Saint Francis Xavier Exposition 2024 Pakistani Pilgrims: पाकिस्तानी गोमंतकीयांना इतर देशांतून भारतात यावे लागते. हे अधिक वेळखाऊ ठरते आणि खर्चही दुपटीने वाढतो.
St Francis Xavier Exposition GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, ता. 19 (प्रतिनिधी): जुनेगोवे येथे होणाऱ्या सेंट फ्रांसिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या मूळ गोमंतकीय वंशाच्या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा सहजपणे जाहीर केला जाऊ नये, अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारला केली आहे.

राज्याच्या गृह खात्याने या नागरिकांनी दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणांची खातरजमा केल्यानंतरच त्यांना महिनाभराचाच व्हिसा देण्यात आला आहे. शंभरेक जणांनी दिलेल्या पत्त्यांची पडताळणी राज्याच्या पोलिस खात्याने केली आहे.

भारतासाठी थेट विमानसेवा नसल्याने पाकिस्तानी गोमंतकीयांची संख्या या खेपेला घटली आहे. जुन्या गोव्यात हे प्रदर्शन 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बाकी सर्व भाविकांप्रमाणेच पाकिस्तानमधील गोमंतकीयांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे, मात्र यावर्षी पाकिस्तानमधून गोव्याला येणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.

Saint Francis Xavier Exposition 2024 Pakistani Pilgrims: पाकिस्तानी गोमंतकीयांना इतर देशांतून भारतात यावे लागते. हे अधिक वेळखाऊ ठरते आणि खर्चही दुपटीने वाढतो.
St. Xavier Exposition: पाकिस्तानातून गोव्यात किती भाविक येणार? आकडेवारीत ५० टक्क्यांनी घट, व्हिसा नव्हे तर हे आहे कारण

पाकिस्तानमधून भारतात थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याने प्रवास अधिक कठीण आणि खर्चीक झाला आहे आणि यामुळे पाकिस्तानी गोमंतकीयांना इतर देशांतून, जसे की दुबई किंवा कतारमार्गे, भारतात यावे लागते. हे अधिक वेळखाऊ ठरते आणि खर्चही दुपटीने वाढतो.

गोमंतकीय वंशाच्या भाविकांना मातृभूमी भेटीची ओढ

पाकिस्तानमधील यात्रेकरूंनी गोवा आणि दमणच्या आर्कडीओसीसकडून निमंत्रण मागवून घेत त्याला व्हिसासोबत जोडून इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय अर्ज केला होता आता ते 28 नोव्हेंबर रोजी कराचीहून गोव्याला येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील गोमंतकियांचे काही वंशज कराचीमध्ये राहतात आणि म्हणूनच ते बऱ्याच काळानंतर पुन्हा गोव्याला जाण्याची अपेक्षा बाळगून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com