Spiritual Tourism Goa: गोव्यात मिळणार गंगा आरतीचा अनुभव; 10.5 कोटी रुपये खर्चून मांडावी किनारी उभारणार भव्य घाट

Aarti Deck on Mandovi: गोवा सरकार सध्या मांडावी नदीच्या किनारी गंगा आरतीप्रमाणे एक घाट तयार करण्याच्या विचारात आहे
Goa Tourism News
Goa Tourism NewsDainik Gomantak
Published on
Updated on

नार्वे: समुद्र किनारे आणि पार्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात पर्यटन विभागाकडून एक नवीन उपक्रम राबवला जाणार आहे. डिचोली तालुक्यात नार्वे या गावात सप्तकोटेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या जीर्णोद्धारामुळे त्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. गोवा सरकार सध्या मांडावी नदीच्या किनारी असलेल्या या मंदिराच्या आवारात गंगा आरतीप्रमाणे एक घाट तयार करण्याच्या विचारात आहे.

मांडावी नदीच्या किनारी आरती घाट

समोर आलेल्या माहितीप्रमाणे गोवा सरकार आणि पर्यटन विभाग गोव्यात अध्यामिक पर्यटनाला चालना देण्यावर लक्ष देऊन काम करत आहे आणि यामधीलच प्रमुख उपक्रम म्हणजे सप्तकोटेश्वर मंदिराच्या आवारात मांडावी नदीच्या किनारी आरतीचा घाट तयार करणं. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना अध्यात्मिक अनुभव मिळवा म्हणून हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

Goa Tourism News
Goa Tourism: गोव्यात पर्यटन कमी होण्यास खरे कारण दलाल! 'शॅक मालक'चा दावा; विदेशी पर्यटक घटले, भारतीयांचा ओघ मात्र वाढला

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेतला जात असून त्यासाठी १०.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात दररोज 'घाट आरती' करण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेली जागा, पूजेचा मंडप, बसण्याची व्यवस्था यांसह पर्यटकांसाठी कॅफेटेरिया आणि माहिती केंद्र अशा सुविधांचा समावेश असणार आहे.

शंकराची भव्य प्रतिमा उभारण्याचा विचार

सप्तकोटेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि म्हणूनच पर्यटन विभागाकडून या प्रकल्पाला आकर्षक बनवण्यासाठी भगवान शंकराची भव्य प्रतिमा उभारण्याचाही विचार करत आहे. हा प्रकल्प आठ ते दहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वास्तुविशारद आणि सल्लागार म्हणून दराशॉ अँड कंपनीच्या सहकार्याने राबविला जाईल. अध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकास करत सरकार राज्यात येणाऱ्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या विचारात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com