Goa Tourism: गोव्यात पर्यटन कमी होण्यास खरे कारण दलाल! 'शॅक मालक'चा दावा; विदेशी पर्यटक घटले, भारतीयांचा ओघ मात्र वाढला

Goa Tourist Report: सुंदर किनारे, समुद्री खाद्यपदार्थ, सांस्कृतिक ठेवा आणि अनोखी जीवनशैली यामुळे गोवा नेहमीच देशी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे.
Goa Tourism Statistics
Goa Tourist ReportDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism Statistics

पणजी: सुंदर किनारे, समुद्री खाद्यपदार्थ, सांस्कृतिक ठेवा आणि अनोखी जीवनशैली यामुळे गोवा नेहमीच देशी आणि विदेशी पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. मात्र, २०२४ नंतर गोव्यातील पर्यटन व्यवसायावर सोशल माध्यमांद्वारे काही संकटे आली आणि यात गोव्याचे रिकामे समुद्रकिनारे, बंद शॅक्स यांचे फोटो व्हायरल झाले.

पर्यटन विभागाच्या अलीकडील आकडेवारीनुसार, गोव्यात देशी पर्यटकांची संख्या वाढली असली तरी परदेशी पर्यटकांच्या आगमनात मोठी घट झाली आहे. २०२३-२४ मध्ये गोव्यात सुमारे ८० लाख पर्यटकांनी भेट दिली, ज्यापैकी बहुतांश देशी पर्यटक होते. मात्र, परदेशी पर्यटकांची संख्या २०१८-१९ च्या तुलनेत निम्म्यावर आली आहे.

गोवा हे अजूनही देशी पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थळ आहे. परंतु परदेशी पर्यटकांचा ओघ परत आणण्यासाठी सरकारने आणि स्थानिक व्यावसायिकांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

जर योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या तर गोवा पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक होऊ शकते, असे इन्व्हेस्टमेंट अपस्टॉक कंपनीने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे.

गोव्यातील स्थानिक टॅक्सी सेवांच्या दरांवर पर्यटकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. २०१८ मध्ये सुरू केलेल्या ‘गोवा माईल्स’ या अ‍ॅपला अपेक्षित यश मिळाले नाही.

Goa Tourism Statistics
Goa Tourism: भातशेती, नारळ, आंबा आणि काजूच्या बागा! गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला नवीन संधी खुणावतेय?

सर्वांनी जबाबदारी स्वीकारावी!

मायकल लोबो यांनी पर्यटन घटण्यास केवळ सरकार जबाबदार नसून सर्व संबंधित घटकांनी यामध्ये जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगितले. लोबो म्हणाले, काही लोक बंगळुरूहून येऊन बीच शॅक्समध्ये वडापाव आणि इडली-सांबार विकतात. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या घटत आहे. मागील दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पर्यटन घटत असल्याचे दिसून येत आहे.

Goa Tourism Statistics
Goa Tourism: 'गोवा सारखं सुरक्षित पर्यटनस्थळ कोणतेच नाही, 5 मिनिटात पोहोचतात पोलिस'; CM सावंत

पर्यटनाला दलालांचे ग्रहण!

पर्यटकांना मोठ्या आश्वासनांची प्रलोभने दलाल देतात; परंतु ती पूर्ण करत नाहीत. परिणामी, सोशल माध्यमांवर गोव्याची प्रतिमा खराब केली जाते आणि ‘गोव्यात फसवणूक होते’ असा संदेश पसरवला जातो. हे दलाल कायमस्वरूपी बंद झाले, तर गोव्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा रुळावर येईल. गोव्यात पर्यटन कमी होण्यास दलाल हे खरे कारण असल्याचे अखिल गोवा शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com