Saptakoteshwar Temple: ऐतिहासिक सप्तकोटीश्वर मंदिर पाहा आता 'व्हर्च्युअली'

Goa Archaeology Department: संकेतस्थळावर व्हर्च्युअल पद्धतीने या मंदिराचे शूटिंग अपलोड करून विभाग वारसास्थळे जपण्यात सक्रिय असल्याचा संदेश
Goa Archaeology Department:  संकेतस्थळावर व्हर्च्युअल पद्धतीने या मंदिराचे शूटिंग अपलोड करून विभाग वारसास्थळे जपण्यात सक्रिय असल्याचा संदेश
Saptakoteshwar TempleDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोर्तुगिजांनी पाडलेले आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले, अशी ज्या मंदिराची ओळख आहे, ते नार्वे येथील ऐतिहासिक सप्तकोटीश्‍वर मंदिर पर्यटकांनाही आभासी (व्हर्च्युअली) पद्धतीने पाहण्याची संधी गोव्याच्या पुरातत्व विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

डॉ. वरद करमली यांच्या सहकार्याने ड्रोनच्या माध्यमातून या मंदिराचे शूटिंग केले आहे. मंगळवारी विभागाने आपल्या संकेतस्थळावर व्हर्च्युअल पद्धतीने या मंदिराचे शूटिंग अपलोड करून विभाग वारसास्थळे जपण्यात सक्रिय असल्याचा संदेश पोहोचविला आहे.

अत्याधुनिक ड्रोनद्वारे व्हर्च्युअल शूटिंग

डॉ. वरद करमली म्हणाले, मी ड्रोन आणि कन्टेन्ट क्रिएशन या विषयात पीएचडी केली आहे. ड्रोनचा वापर करून विविध स्थळे व्हर्च्युअली लोकांना दाखविणे माझे लक्ष्य आहे. गोव्यात अशी अनेक स्थळे आहेत जिथे लोकांना जाण्याची इच्छा आहे. मात्र, काही कारणास्तव ते त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. कालांतराने या स्थळाचे सौंदर्यीकरण करण्यात येईल. अशावेळी जुन्या आठवणी कायमच्या संपुष्टात आलेल्या असतील. या आठवणी कायम ठेवण्यासाठी प्रगत विज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने अशी अनेक ठिकाणे आहेत जी व्हर्च्युअली लोकांना पाहण्याची संधी देऊ शकतो. अशा काही स्थळांची माहिती मी गोवा सरकारच्या संबंधित विभागांना पत्राद्वारे कळवून ती स्थळे व्हर्च्युअली जीवंत ठेवण्याची विनंती केली आहे. सरकारने त्यासाठी मंजुरी दिल्यास गोव्यातील अनेक स्थळे लोकांना व्हर्च्युअली अनुभवता येतील.

डॉ. वरद करमली, निर्माता, ड्रोनाचार्य व्हर्च्युअल

वारसास्थळांचे छायाचित्रण गरजेचे

राज्यातील धरणे, किल्ले, मंदिर, चर्च, आग्वाद तुरुंग अशा काही स्थळांचे व्हर्च्युअली शूट होणे देखील गरजेचे आहे. कालांतराने वारसास्थळांचे सौंदर्यीकरण करण्याची गरज भासणार आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी तसेच लोकांना मूळ कलाकृती पाहणे शक्य होणार नाही. ती कलाकृती जोपासून ठेवण्यासाठी व्हर्च्युअल माध्यम हा योग्य पर्याय सरकारकडे असल्याने सरकारने गांभीर्याने इतर स्थळांचे देखील व्हर्च्युअली शूट करण्याची मागणी होऊ लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com