Goa Ferry Boat: तिकिटांचे ॲप, ‘क्यूआर कोड'वरील खर्च गेला वाया

Goa Ferry Boat: फेरीबोटीचे दुखणे : नदी परिवहन खाते उभारी घेण्यापेक्षा आणखीनच डबघाईला
Goa Ferry Boat
Goa Ferry BoatDainik Gomantak

Goa Ferry Boat: राज्यात दुचाकी व प्रवाशांसाठी मोफत सेवा देणारे आणि चारचाकी व निम्न अवजड वाहनांसाठी कमीत कमी दर आकारणारे नदी परिवहन खाते आणखीनच खर्चाच्या खाईत चालले आहे. नदी परिवहन खात्याने वाढीव शुल्क आकारणीसाठी मोबाईल ॲप आणि क्यूआर कोड सुविधा निर्माण केली होती. त्यासाठी खात्याने अवाढव्य खर्चही केला होता.

Goa Ferry Boat
Goa Government: शासकीय कामात रोख व्यवहार होणार बंद

आता वाढीव तिकीट दर आकारणीच मागे घेतली जाणार असल्याने हा खर्चही वाया गेल्यातच जमा आहे. राज्यात दुचाकी व प्रवाशांसाठी मोफत, तर चारचाकी वाहनांसाठी दहा रुपये तिकीट आकारले जाते.

चारचाकी तसेच अवजड वाहनांना आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून नदी परिवहन खात्याला वर्षाला सुमारे 70 लाख रुपये मिळतात, तर या खात्याचा वर्षाचा एकूण खर्च 45 कोटी रुपये आहे. त्यामुळे ही सेवा म्हणजे सरकारसाठी अवघड जागेचे दुखणे बनले आहे.

खात्याची ही सेवा स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यातूनच दुचाकींना शुल्क आकारण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी खात्याने 18 ही मार्गांवरील फेरीबोटीतून ये-जा करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण केले होते.

फेरीबोटींतून सुमारे 12 ते 15 हजार दुचाकीस्वार ये-जा करीत असल्याचे दिसून आले. जर दुचाकीला दर दिवशी दहा रुपये शुल्क आकारले तर दिवसाला दुचाकींच्या माध्यमातून दीड लाखाचा निधी खात्याला मिळाला असता.

नियमित ये-जा करणाऱ्यांसाठी खात्याने दुचाकी व चारचाकींसाठी अत्यंत कमी शुल्कात पास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही वाढीव शुल्क आकारणी सुरू होण्यापूर्वी तिला खीळ बसली आहे.

Goa Ferry Boat
Land Grabbing Case: 12 कोटींची मालमत्ता जप्त

दरवाढ मागे; दोन दिवसांत अधिसूचना

फेरीबोटीतील वाढीव शुल्क आकारणी व चारचाकी वाहनांची तिकीट दरवाढ मागे घेतली जाणार आहे. त्याची अधिसूचना दोन दिवसांत निघेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीतील एका कार्यक्रमात सांगितले. दुचाकींना लागू केलेले शुल्क तसेच भाडेवाढीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यापूर्वीच सांगून निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला होता.

घरचा अहेर

फेरीबोट वाढीव शुल्क आकारणी १६ नोव्हेंबरपासून होणार होती. परंतु त्याला भाजपच्याच आमदारांनी विरोध केला. नवी शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यासंदर्भातील अधिसूचना दोन दिवसांत निघेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्यांचे आभार मानले. कारण मये, डिचोली या मतदारसंघांतून हजारो प्रवासी दुचाकी व चारचाकीद्वारे पणजीत दररोज ये-जा करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com