Goa: गणेशोत्सव काळात घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात व्यवसायिकांना हणजुण पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी पोलीस स्थानकात घेतलेल्या या विशेष बैठकीत परिसरातील छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक तसेच खाजगी गेस्ट हाऊसचे मालक तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना कायदा सुव्यवस्था तसेच कोवीड संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात मार्गदर्शन करतांना हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस
स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना कायदा सुव्यवस्था तसेच कोवीड संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात मार्गदर्शन करतांना हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस संतोष गोवेकर
Published on
Updated on

शिवोली: गणेशोत्सव काळात किनारी भागातील  शिवोली मतदार संघाच्या कक्षेत येणाऱ्या किनारी भागातील हॉटेल व्यवसायिक तसेच खाजगी गेस्ट हाऊस मालकांनी गणेशोत्सव काळात कोवीड महामारीच्या पाश्वभुमीवर सरकारी नियमांचे पालन करण्यासंदर्भात हणजुण पोलिसांकडून संबंधित व्यवसायिकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना कायदा सुव्यवस्था तसेच कोवीड संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात मार्गदर्शन करतांना हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस
Ganesh Chaturthi Special Modak: रूप एक, स्वाद अनेक

यावेळी, हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी पोलीस  स्थानकात  घेतलेल्या या  विशेष बैठकीत परिसरातील छोटे-मोठे हॉटेल व्यवसायिक तसेच खाजगी गेस्ट हाऊसचे मालक  तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गेस्ट हाऊसमध्ये पर्यटकांना प्रवेश देतेवेळी  त्यांची ओळखपत्रे घेणे, परिसरात सीसीटीव्ही केमेरे लावणे, ध्वनिप्रदूषण टाळणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यांचप्रमाणे एखाद्याच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून स्थानिक पोलिसांना तात्काळ त्या संदर्भात माहिती करून देण्याचे निरीक्षक गांवस यांनी उपस्थितांना आवाहन केले.

स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना कायदा सुव्यवस्था तसेच कोवीड संदर्भात घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात मार्गदर्शन करतांना हणजुणचे पोलीस निरीक्षक सुरज गांवस
Ganesh Chaturthiसाठी ‘गाववाले’ घराकडे परतायला लागले!

दरम्यान, परिसरातील गणेश मंडळांनी कोवीडच्या तिसऱ्या लाटेची संभाव्य भिती तसेच त्यासंदर्भात घ्यावयाची  काळजी आणी  सरकारी नियमांचे पालन करीत स्वता:बरोबरच  तसेच इतरांचीही काळजी घेण्याचे स्थानिक गणेश भक्तांना भावनिक आवाहन हणजुण पोलिसांकडून करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com