Ganesh Chaturthi Special Modak: रूप एक, स्वाद अनेक

मलई, काजू, चॉकलेटच्या मोदकांना (Modak) भारी मागणी
Ganesh Chaturthi 2021: Modak
Ganesh Chaturthi 2021: ModakDainik Gomantak

पणजी : मोदक (Modak) आणि गणरायाचे (Ganesh Chaturthi) अनोखे नाते आहे. मलई, काजू, मावा, चाॅकलेट, दुधाच्या स्वादातल्या रेडिमेड मोदकांचे रूप मात्र एकच आहे. बाप्पांचा आवडता खाद्यपदार्थ असलेले मोदक अनेक स्वादांत, रंगांत चतुर्थी जवळ आल्यामुळे शहरातील दुकानातून ग्राहकांना मिळावेत यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे.

दुकानांतील मोदकांना घरगुती तळलेल्या, उकडीच्या मोदकांची चव नसली तरी दिवसेंदिवस ग्राहकांच्या पसंतीस ते उतरत असल्यामुळे स्वादातही वेगवेगळे बदल केले जात आहेत. गोव्याबाहेरून येणारे मोदक छान पॅकेटसमधून थोड्या स्वस्तात उपलब्ध होतात. सहकार भांडारापासून काही दुकानांतही अशी मोदकांची पॅकेटस विकायला ठेवल्याचे पाहायला मिळते. मिठाईच्या दुकानांपुरतेच नव्हे तर बेकरी, फरसाणच्या दुकानातही छोट्या, मोठ्या आकारात मोदक आकर्षकरित्या मांडणी करून विकले जातात.

Ganesh Chaturthi 2021: Modak
Ganesh Chaturthi: गोव्यात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी

गोव्यातील घरचे मोदक म्हणजे पुरणाचे, गूळ-खोबऱ्याचे. अलीकडे उकडीचे मोदक तळलेल्या मोदकांपेक्षा छोट्या-मोठ्यांच्या आवडीचे झाले असल्यामुळे काही घरात आवर्जून ते केले जातात; पण चतुर्थीदिवशीच.

विविध रंग, स्वादातील मोदकांचे आकर्षण

  • चतुर्थीआधीच मोदकांचा आस्वाद घ्यायचा असेल तर पणजीतील कॅफे सेंट्रल, गुजरात स्वीट मार्ट, माॅडर्न बेकरीत जायला हरकत नसावी.

  • छान कळीदार मोदक कॅफे सेंट्रलमध्येच पाहावेत तर लहान मोदक माॅडर्नमध्येच.

  • गुजरात स्वीट मार्टमध्ये विविध रंगांतल्या स्वादांतल्या मोदकांच्या आस्वादासाठी सर्वधर्मीय येतात. कॅफे सेंट्रलमध्ये मलई, काजू, दुधाच्या मोदकांना भारी मागणी आहे.

  • महिला परिषदेच्या दालनात खास घरगुती स्वादातले दुधाचे, चाॅकलेट मोदक मागणीनुसार बनवले जातात.

Ganesh Chaturthi 2021: Modak
Ganesh Festival in Goa: गणेश भक्तांची छोट्या मूर्तींना पसंती
  • सुक्या मेव्याचे मोदकही काही मिठाईच्या दुकानांतून दिसतात. बिग मिश्रांच्या मोदकांचा स्वाद अनोखा. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ ग्राहक ठरलेले असतात.

  • 500 ते 1 हजार रुपये किलोपर्यंत विविध स्वादातील मोदकांची किंमत आहे तर अडीचशे-तीनशे रुपयांत गोव्याबाहेरून येणाऱ्या एकवीस छोट्या मोदकांचे पॅकेटस उपलब्ध करण्याची कसरतही केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com