IFFI 2022 Goa: 'इफ्फी'त स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने गौरव होणार

यंदा 'इफ्फी'त 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपटांची मेजवानी
IFFI 2022 Goa
IFFI 2022 GoaDainik Gomantak

IFFI 2022 Goa: यंदाचा 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) कान्सच्या धर्तीवर भव्य दिव्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. यंदा 79 देशांतील 280 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन रसिकांना पाहायला मिळेल. याशिवाय प्रथमच 221 भारतीय आणि 118 आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. मुरुगन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

IFFI 2022 Goa
ESMA Implemented In Goa: गोव्यात 'एस्‍मा' लागू; कायद्यानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संप करण्यास बंदी

यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा, एनएफडीसी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर, पीआयबीचे सत्येंद्र प्रकाश उपस्थित होते. डॉ. मुरुगन म्हणाले, यावर्षी भारतीय चित्रपटांना जागतिक व्यासपीठावर नेण्याबरोबर भारतीय सिनेमाला प्रोत्साहित करणारे अनेक बदल करण्यात आले आहेत. यंदा प्रथमच 183 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होईल. सौरा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डिप्रोसासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा ‘गोल्डन बेअर’ ला काजा आणि पेपरमेंट फ्रॉफेसाठी दोन सिल्वर बियर पुरस्काराने सन्मानित आहेत. यावर्षीचे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आशा पारेख यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन होईल.

याशिवाय मणीपुरी चित्रपट सृष्टीचा सुवर्णमहोत्सव म्हणून त्यांच्या दहा चित्रपटांचे प्रदर्शन होईल. श्रद्धांजली विभागात 15 भारतीय आणि 5 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असेल. यात भारतरत्न लता मंगेशकर, गायक संगीतकार बप्पी लहरी, कथथक वादक पंडित बिरजू महाराज, अभिनेते रमेश देव, माहेश्वरी अम्मा, गायक के के, दिग्दर्शक तरुण, मिस्टर निपोन दास, भूपेंद्र सिंग, बॉब राफेलसन, इव्हान रिटमन, पीटर बोगदानोवीच, मोनिका विट्टी यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.

IFFI 2022 Goa
2 Awards For Dainik Gomantak: माहिती खात्यातर्फे 'गोमन्तक'ला दोन पुरस्कार जाहीर

इंडियन पॅनोरमात 45 चित्रपट

यंदा इंडियन पॅनोरमामध्ये 25 फीचर तर 20 नॉन फीचर फिल्मचे प्रदर्शन होईल. या विभागाची सुरवात कन्नड चित्रपट निर्माते पृथ्वी कोनानुर यांच्या ‘हदीनेलेंटू’ या चित्रपटाने तर दिव्या कावसजी यांच्या ‘शो मस्ट गो’ लघुपटाने होणार आहे. यात 5 मराठी तर एका कोकणी चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत ऑस्करसाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’चे विशेष स्क्रीनिंग असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com