2 Awards For Dainik Gomantak: माहिती खात्यातर्फे 'गोमन्तक'ला दोन पुरस्कार जाहीर

ज्येष्‍ठ पत्रकार सिरिल डी कुन्हा यांना ‘जीवन गौरव’ ; 16 नोव्हेंबर रोजी वितरण
Raju Nayak, Sandip Desai
Raju Nayak, Sandip Desai Dainik Gomantak
Published on
Updated on

2 Awards For Dainik Gomantak: माहिती आणि प्रसिद्धी खात्‍यातर्फे पत्रकारिता पुरस्‍कारांची घोषणा करण्‍यात आली आहे. सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांना, तर वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार संदीप देसाई (गोमन्‍तक) यांना जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार सिरिल डी कुन्हा यांना ‘जीवन गौरव’ने सन्‍मानित करण्‍यात येणार आहे.

Raju Nayak, Sandip Desai
Arjuna Award For Bhakti Kulkarni: गोव्याच्या बुद्धीबळपटू भक्ती कुलकर्णी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

भारतीय वृत्तपत्र मंडळाच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय पत्रकारिता दिवस बुधवारी (ता. 16) साजरा करण्यात येणार आहे. मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात दुपारी 3 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्‍कारांचे वितरण होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती व प्रसिद्धी खात्‍याचे सचिव सुभाष चंद्र व इतर मान्यवर उपस्थित असतील. राजू नायक यांच्या ‘विद्वेशकारण’ या स्‍तंभलेखाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

गतवर्षी प्रकाशित झालेल्या बातम्या आणि लेखांसाठी नऊ श्रेणींमध्ये ‘गोवा राज्य पत्रकार पुरस्कार’ देण्‍यात येतात. विविध श्रेणींमध्ये प्रत्येकी रोख 10 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

गोवा एडिटर्स गिल्ड, गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट, फोटो जर्नलिस्ट असोसिएशन गोवा, इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन, स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन गोवा आणि दक्षिण गोवा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यम आणि पत्रकार बांधवांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Raju Nayak, Sandip Desai
Karnataka's Trawlers Seized : गोव्याच्या हद्दीत मासेमारी करणारे कर्नाटकचे 3 ट्रॉलर्स जप्त

समर्पित सेवेचा सन्‍मान

ज्येष्‍ठ पत्रकार सिरिल डी कुन्हा यांना त्यांच्या समर्पित सेवा आणि पत्रकारितेतील अफाट योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्‍यात आला आहे. याशिवाय माजी संपादक राजेंद्र देसाई, विठ्ठलदास हेगडे, अरविंद टेंगसे, ज्येष्‍ठ पत्रकार पीटर डिसोझा आणि किशोर शेट मांद्रेकर यांचा पत्रकारितेतील भरीव योगदानाबद्दल सदर कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्‍ठ पत्रकार पांडुरंग गावकर करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com