South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती

Suvarna Tendulkar Resignation: आपल्या तीन वर्षे सात महिन्यांच्या कालावधीत आपल्यावर कसलाही ठपका नाही किंवा जिल्हा पंचायतीच्या कुठल्याही सदस्याचा आपल्यावर दबाव नाही.
South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती
Suvarna Tendulkar ResignationDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या तीन वर्षे सात महिन्यांच्या कालावधीत आपल्यावर कसलाही ठपका नाही किंवा जिल्हा पंचायतीच्या कुठल्याही सदस्याचा आपल्यावर दबाव नाही. केवळ पक्षाच्या आदेशानुसारच आपण राजीनामा देत आहे, असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतच्या अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले.

पुढील आठ ते दहा दिवसांत नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. तोपर्यंत विद्यमान उपाध्यक्ष खुशाली वेळीप कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, असे तेंडुलकर यांनी सांगितले. त्या उद्या आपला राजीनामा पंचायत संचालनालयाच्या संचालकांकडे सादर करणार आहेत. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत १४ भाजपचे, ३ ‘मगो’चे, ६ कॉंग्रेसचे व दोन इतर सदस्य आहेत.

South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती
South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती

आपल्या कारकिर्दीत ५१७ विकासकामांच्या निविदा जारी करण्यात आल्या व बहुतेक कामे पूर्ण झाली. अजून ३० ते ३५ कामांच्या निविदा जारी करण्यात येतील. २००० सालापासून जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झाल्या नाहीत; पण आम्ही पंचायत, नगरपालिका व जिल्हास्तरावर २२९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आणि सरकारने त्याला मंजुरीही दिली. राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा पंचायत सदस्याला विकासकामांसाठी मंजूर केलेल्या निधीतूनच विकासकामे साकार झाल्याचे अध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले सांगितले.

तेंडुलकर, वेळीप यांचा सत्कार

दक्षिण जिल्हा पंचायतीतर्फे सुवर्णा तेंडुलकर तसेच उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य अधिकारी गौरीश शंखवाळकर उपस्थित होते. यावेळी विरोधी जिल्हा पंचसदस्यांनीही भाजपच्या नेत्यांनी सुवर्णा तेंडुलकर यांना राजीनामा द्यायला लावू नये, असे सांगितले.

South Goa Zilla Panchayat: पक्षाच्या आदेशानुसार राजीनामा, कुणाचाही दबाव नाही; सुवर्णा तेंडुलकर यांची स्पष्टोक्ती
South Goa Zilla Panchayat : दक्षिण गोवा जिल्हा परिषदेच्या बैठकीत विविध ठराव मंजूर

अध्यक्षांचे सदैव मार्गदर्शन

कोलवा जिल्हा पंचायत सदस्य वानिया बाप्तिस्त यांनी सांगितले की, अध्यक्षांनी सदैव आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी कधीच भेदभेवाचे राजकारण केले नाही. उपाध्यक्ष खुशाली वेळीप यांनीही सुवर्णा तेंडुलकर यांच्या कामाची प्रशंसा केली. आपणही पक्षश्रेष्ठींना त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे.

सुवर्णा तेंडुलकर, अध्यक्ष, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत

आपला दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदाचा कार्यकाळ खडतर होता. आठ मुख्य अधिकारी, ४ अधिकारी, अभियंते बदलले गेले. त्यामुळे कामांची गती मंदावली; पण सर्व २५ सदस्यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा लाभला. पक्ष संघटनेचा, प्रदेशाध्यक्ष तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा लाभला. मात्र पुढील एक वर्ष पाच महिन्यांसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण असेल हे आपल्याला माहीत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com