South Goa Zilla Panchayat : दक्षिण गोवा जिल्हा परिषदेच्या बैठकीत विविध ठराव मंजूर

पगारवाढीची मागणी : ज्यादा ज्युनियर अभियंत्यांची आवश्‍यकता
South Goa Zilla Panchayat meeting
South Goa Zilla Panchayat meetingDainik Gomantak
Published on
Updated on

Various Resolutions Passed In South Goa Zilla Panchayat Meeting: दक्षिण गोवा जिल्हा परिषदेची बैठक सोमवार, 14 रोजी अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली व काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्षांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

आमदार, नगरसेवक, पंचायत सदस्य या सर्वांच्या पगारामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे आम्हाला मिळत असलेले महिन्याकाठी 15 हजार रुपये कमी असल्यामुळे त्यात वाढ करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आल्याचे अध्यक्ष तेंडुलकर यांनी सांगितले.

South Goa Zilla Panchayat meeting
सभापती तवडकर कामासाठी दबाव आणतात, अपमानित केले; पैंगीण ZP सदस्य बैठकीत ढसाढसा रडल्‍या

शिवाय सध्या जिल्हा परिषदेला केवळ १५ लाख रुपयांपर्यंतची कामे करण्याची मंजुरी आहे. ही रक्कम वाढवून ३० लाख रुपये करावी, असा मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.

सध्या जिल्हा परिषदेतर्फे अनेक विकासकामे हातात घेतली जात आहेत. १३ कामांच्या निविदा जाहीर झाल्या आहेत, तर ३५ कामांच्या निविदा एक-दोन दिवसांत जाहीर होतील.

पण या कामांवर देखरेख करण्यासाठी किंवा त्यावर तांत्रिक कामांसाठी पुरेसे ज्युनियर अभियंते नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

South Goa Zilla Panchayat meeting
CM Pramod Sawant : कला अकादमी स्‍लॅब प्रकरणात मुख्‍यमंत्र्यांकडून मंत्री गावडेंना क्‍लीन चिट

"एका अभियंत्याची बदली होत आहे. ही बदली होऊ नये यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या जिल्हा परिषदेकडे पाच ज्युनियर अभियंते आहेत. त्यातील एक नियमित तर बाकीचे चार केवळ दोन दिवसांसाठी कचेरीत येतात. त्यामुळे कामे पूर्ण होण्यासाठी भयंकर त्रास जाणवतात."

- सुवर्णा तेंडुलकर, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष

बैठकीत उपस्थित महत्त्वाचे मुद्दे

  1. पंचायतीतर्फे मनरेगाची कामे केली जातात. या कामांची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे द्यावी, अशी मागणीही बैठकीत सदस्यांनी केली. त्याचप्रमाणे ऑक्ट्रोय करही जिल्हा पंचायतीला पूर्ववत देण्याची मागणी करण्यात आली.

  2. काही सदस्यांनी बैठकीत स्थानिक आमदार कुठल्याही कार्यक्रमात जिल्हा पंचायत सदस्यांना आमंत्रित करीत नाहीत किंवा त्यांना विकासकामांची व इतर माहिती देत नाहीत, असे सांगितले. यावर काहीतरी विचारविनिमय व्हावा, असे सुचविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com