NH66 Highway Goa: राष्ट्रीय महामार्ग 66 बाबत नवीन अपडेट! रुंदीकरणाचे काम होणार सुरु; 764 कोटी मंजूर

Goa Highway Widening: दोन्ही रस्त्यांच्या चाैपदरीकरणाचे अंतर अंदाजे २२ किलोमीटर आहे. या कामासाठी केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ मध्ये १३७६ कोटींचा निधी मंजूर केला होता.
Goa Highway Widening
Goa Highway Widening Dainik Gamantak
Published on
Updated on

सासष्टी : दक्षिण गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील दोन रस्त्यांचे चारपदरी रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. बेंडुदे ते काणकोण(बगल रस्ता) व दुसरा रस्ता काणकोण ते पोळे (बगल रस्ता) या दोन रस्त्यांचा यात समावेश आहे.

या दोन्ही रस्त्यांच्या चाैपदरीकरणाचे अंतर अंदाजे २२ किलोमीटर आहे. या कामासाठी केंद्र सरकारने डिसेंबर २०२४ मध्ये १३७६ कोटींचा निधी मंजूर केला होता. या कामासाठी भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यात आल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याची शक्यता सार्वजनिक बांधकाम खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Goa Highway Widening
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 'धूम' स्टाईल दरोड्याचा प्रयत्न! गोव्याला जाणाऱ्या 'कुरिअर कंटेनर'चा पाठलाग अन् दगडफेक, 6 जणांवर गुन्हा दाखल

नावेली ते कुंकळ्ळी हे ७.२ किलोमीटर अंतराचे कामही यात समाविष्ट आहे. या कामासाठी ७४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामासाठी एएससी इन्फ्रा कंपनीला ४५६ कोटींचे कंत्राट देण्यात आले. मूळ खर्चापेक्षा ३० टक्के रक्कम कमी देण्यात आली आहेे.

काणकोण भागातील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. नावेली ते कुंकळ्ळी भागातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठीच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. या कामामध्ये रेल्वे उड्डाण पुलाचा समावेश आहे. कोकण रेल्वेतर्फे जूनमध्ये या कामासंदर्भात पाहणी करून काही सूचना केल्या आहेत.

Goa Highway Widening
Bhoma Highway: 'गडकरींचे उत्तर दिशाभूल करणारे'! भोमवासीय बगलमार्गाच्या मागणीवर ठाम; वाद चिघळण्याची शक्यता

कोकण रेल्वेच्या सूचनेप्रमाणे सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम करताना केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने कोकण रेल्वेशी समन्वय साधण्याची सूचना करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com