

पणजी/ वास्को: दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सुरू असलेले कामकाज आणि भविष्यातील विस्ताराबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्लीत मंगळवारी सकाळी पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याबरोबर भेट घेतली.
या भेटीत दोघांनीही राजनाथ सिंग यांच्याकडे गोव्याच्या कनेक्टिव्हिटी, अर्थव्यवस्था, पर्यटन आणि रोजगारासाठी दाबोळी विमानतळाचे महत्त्व अधोरेखित करणारे सविस्तर निवेदन सादर केले. त्याशिवा त्याच्या अखंडित कामकाजासाठी आणि नियोजित पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी सहकार्य मागितले.
संरक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने हे विमानतळ गोव्यातील लोकांची सेवा करत राहील, तसेच राज्याची कनेक्टिव्हिटी आणि वाढ मजबूत करेल, असा विश्वास माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला. तसेच दाबोळी विमानतळाच्या अखंडित कामकाजासाठी आणि नियोजित पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी राजनाथ सिंग यांच्या समर्थनाची गरज व्यक्त केली. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने दाबोळी विमानतळ गोव्याची लोकांची सेवा करत राहिल, असा विश्र्वास मंत्री गुदिन्हो यांनी व्यक्त केला आहे.
दाबोळी विमानतळाबाबत अनेकदा अफवा पसरत असतात. ‘मोपा’मुळे दाबोळी विमानतळ बंद होणार असल्याचे सर्रास बोलले जात आहे. तथापि या गोष्टींत कोणतेही तथ्य नसल्याचा दावा सतत करण्यात येतो.परंतु आरोप प्रत्त्यारोप चालूच असतात. दाबोळी व मोपा विमानतळांची गरज गोव्याला असल्याने दाबोळी कधीच बंद होणार नाही, अशी ग्वाही मंत्री गुदिन्हो देतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली. दाबोळी विमानतळ गोव्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, याचा पुनरुच्चार चर्चेप्रसंगी मंत्री गुदिन्हो यांनी केला.
दरम्यान, दाबोळी विमानतळ टर्मिनलचा १८हजार ३० चौरस मीटरचा विस्तार करण्यात येत आहे. सदर काम अंतिम टप्प्यात आहे. या मध्ये चेक-इन-काऊंटर, बोर्डिंग गेट्स , पाच नवीन एस्केलेटर व इतर बाबींचा समावेश आहे. पर्यटनाला सेवा देण्यासाठी सदर विमानतळाची क्षमता वाढविण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तेथे ड्युटी-पेड दुकाने सुरु करण्यात येणार असल्याचे दाबोळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक आकाश दीप यांनी स्पष्ट केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.