Francisco Sardinha: पोर्तुगीजांनी गोव्याचे काय वाईट केले? त्यांनी अनेक चांगल्या गोष्टीही केल्या

खासदार सार्दिन यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार; एसटी आरक्षणासाठी केंद्राला लिहीले पत्र
Francisco Sardinha
Francisco SardinhaDainik Gomantak

Francisco Sardinha: शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातून पोर्तुगीजांच्या खाणाखूना मिटवणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यात वार-पलटवार सुरू झाले आहेत.

दक्षिण गोव्याचे काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

Francisco Sardinha
Goa Police: 'एनआरआय'च्या घरी चोरी करणाऱ्यांविरोधात पोलिसांची लुकआऊट नोटीस; सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली ओळख

खासदार फ्रान्सिस सार्दिन म्हणाले की, पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. या काळात त्यांनी काही वाईट गोष्टी केल्या पण अनेक चांगल्या गोष्टीही केल्या. अनेक देशांच्या वसाहती होत्या, पण पोर्तुगीजांनी त्यासर्वांपेक्षा उल्लेखनीय काम केले.

ते म्हणाले, पोर्तुगीजांनी गोव्याला कधीही वसाहतीप्रमाणे वागवले नाही तर पोर्तुगीजांचा भाग असल्याचेप्रमाणे वागणूक दिली. पोर्तुगीजांनी काय वाईट केले आहे?

सार्दिन म्हणाले, पोर्तुगीजांनी गोव्याला चांगला सांस्कृतिक वारसा दिला. अनेक गोमंतकीय पोर्तुगालमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी गोमंतकीय संस्कृती पोर्तुगालला नेली आहे. पोर्तुगीजांनीही ते स्विकारले आहे.

मला मुख्यमंत्र्यांना सांगायचे आहे की, संस्कृती-संस्कृतींमध्ये भांडण लावण्याचे काम करू नका, काय स्विकारायचे काय नाही, हे लोकांना ठरवू द्या.

Francisco Sardinha
Goa School Student: चिंताजनक! राज्यातील 55 टक्के शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच नाही!

पोर्तुगीजांना मंदिरे उद्धवस्त केली. ती पुन्हा बांधणार असे मुख्यमंत्री म्हणाले. पण माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी चांगले रस्ते बांधावेत, चांगल्या पायाभूत सुविधा उभाराव्यात. लोकांना सुप्रशासन हवे आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार थांबवावा.

एसटी आरक्षणासाठी केंद्राला पत्र

दरम्यान, अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण देण्याबाबत केंद्र सरकारला पत्र लिहिले असल्याचीही माहिती खासदार सार्दिन यांनी दिली. मी या आरक्षणाच्या बाजूने आहे, असे सार्दिन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com