Goa Police: 'एनआरआय'च्या घरी चोरी करणाऱ्यांविरोधात पोलिसांची लुकआऊट नोटीस; सीसीटीव्ही फुटेजमुळे पटली ओळख

सोन्याचे दागिने, पाऊंड्ससह चोरला होता 1 लाख 6 हजाराचा मुद्देमाल
Goa Police lookout notice against thief
Goa Police lookout notice against thiefDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Crime: गोव्यातील चिखली येथील एका घरात मे महिन्यात चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या चोरीतील संशयित आरोपींची ओळख पटली आहे. आमीर सिकदर आणि मोहम्मद अली अशी त्यांची नावे आहेत.

पैकी सिकदर हा मूळचा बांग्लादेशचा आहे तर मोहम्मद हा दिल्लीचा आहे. आता पोलिसांनी या दोघांविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

Goa Police lookout notice against thief
Goa Mid Day Meal: चिंताजनक! राज्यातील 55 टक्के शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच नाही!

हे घर जोसेफ सिक्वेरा यांचे असून ते एनआरआय आहेत. ते येथे नसताना ही चोरी झाली होती आणि सिक्वेरा यांचे बंधु आशिष यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये कंपाऊंडवरून दोन चोरटे बंगल्यात शिरताना दिसले होते. तेव्हापासून या चोरट्यांची ओळख पटवली जात होती.

या चोरट्यांनी दोन घड्याळे, दोन इअररिंग्ज, 500 पाऊंड्स आणि 25 हजार रूपयांची रोक असा एकूण 1 लाख 6 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. जोसेफ एप्रिलमध्ये गोव्यात आले होता. 28 एप्रिलला ते परत गेले. तेव्हापासून बंगला बंद होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kunkalli Theft Case
Goa Casino Director Shooting Case
Karapur One Goa Project Protest
Goa Name Change Law 1990
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com