Selaulim Water Plant: साळावलीत साकारणार 3रा जलशुद्धीकरण प्रकल्प! मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता; कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा होणार वापर

Selaulim Water Treatment Plant: यंदाच्या मे महिन्यापर्यंत तो सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
Selaulim water treatment plant
Selaulim water treatment plantDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्याला अजूनही भासणारी पेयजल टंचाई दूर करण्यासाठी लवकरच साळावली येथे तिसरा जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहत आहे,असे प्रकल्प अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

यंदाच्या मे महिन्यापर्यंत तो सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पात पहिल्यांदाच कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सध्या दक्षिण गोव्याला पेयजल पुरवठा करण्यासाठी साळावली येथे दोन जलशुद्धीकरण प्रकल्प यापूर्वीच चालू आहेत परंतु लोकसंख्या वाढत असल्याने आता अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यासाठीच हा तिसरा प्रकल्प उभारला असून एप्रिलमध्ये चाचणीसाठी तो सज्ज होणार आहे.

हा नवीन १०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प, दक्षिण गोव्याला ही सर्व कमतरता दूर करण्यास मदत करेल. भारतात प्रथमच, हा प्रकल्प पारंपरिक पद्धतीचा वापर न करता, कॅनडामधून आयात केलेल्या फिल्टर अंडरड्रेन प्रणालीचा वापर करेल, ज्यामुळे गाळणीसाठी कमी वेळ लागत असल्याने शुद्ध पाण्याची निर्मिती ववाढण्यास मदत होणार आहे.

हा प्रकल्प ३७० कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे, ज्यामध्ये शेळपे ते शिरवई, केपे ते मडगाव, पुढे वेर्णा आणि वेर्णा ते दाबोळीपर्यंतच्या वितरणासाठी नवीन पाइपलाइनच्या खर्चाचाही समावेश असेल. ‘नवीन प्रकल्प तयार झाल्यावर दक्षिण गोव्यातील पाण्याची सर्व कमतरता भरून काढली जाईल.

Selaulim water treatment plant
Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

मुरगाव तालुक्यात, दाबोळीपर्यंतच्या क्विनीनगर आणि जुआरीनगर भागांत पाणीटंचाई आहे, जे वितरण प्रणालीच्या शेवटच्या टोकाला येतात. नवीन प्रकल्पामुळे, गळतीचा विचार करून, आम्हाला मडगाव आणि सासष्टीच्या काही भागांना पाणीपुरवठ्यासाठी अतिरिक्त ९५ एमएलडी पाणी उपलब्ध होईल.

Selaulim water treatment plant
Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

हे पाणी, सध्या कार्यरत १०० एमएलडी आणि १६० एमएलडी प्रकल्पांतून मिळणाऱ्या पाण्यासोबत, आम्हाला वर्षाच्या मध्यापर्यंत दक्षिण गोव्याला अधिक तास पाणीपुरवठ्यास मदत करेल, असे तांत्रिक विभाग अधिकारी महेश हळदणकर यांनी सांगितले. ‘जायका’अंतर्गत १०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारला, तेव्हाच्या मूल्यांकनातच २०२५ पर्यंत दक्षिण गोव्यात १०० एमएलडी प्रक्रियायुक्त पाण्याची गरज भासेल, असे नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com