Canacona Water Problem: 8 दिवस पाण्याची टंचाई! ग्रामस्थांनी घातला सहाय्यक अभियंत्याला घेराव; मास्तीमळ येथे पाणीप्रश्न ऐरणीवर

Canacona Water Shortage: नवीन कनिष्ठ अभियंत्याने ताबा घेतल्यानंतर आगोंद पंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा सुरू करताना मास्तीमळ प्रभागाच्‍या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत आहे.
Goa Water Problem
Tap WaterCanva
Published on
Updated on

काणकोण: काणकोण पालिका क्षेत्रातील मास्तीमळ प्रभागात गेल्‍या आठ दिवसांपासून पाण्‍याची टंचाई भासत आहे. नळ कोरडे पडले आहेत. त्‍याच्‍या निषेधार्थ ग्रामस्‍थांनी नगरसेवक धीरज नाईक गावकर यांच्यासमवेत पाणीपुरवठा खात्याचे साहाय्यक अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.

यापूर्वी आगोंद भागात २४ तास पाणीपुरवठा होत होता. मात्र आता नवीन कनिष्ठ अभियंत्याने ताबा घेतल्यानंतर आगोंद पंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा सुरू करताना मास्तीमळ प्रभागाच्‍या जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यात येत आहे.

Goa Water Problem
Bicholim Water Crisis: डिचोलीत चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, पाईपलाईन शिफ्टिंगमुळे नागरिक त्रस्त

त्‍यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे नगरसेवक गावकर यांनी सांगितले. दरम्‍यान, साहाय्यक अभियंत्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांशी चर्चा करून पाणीपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याचे आश्‍‍वासन रहिवाशांना दिले.

Goa Water Problem
Bicholim Water Crisis: डिचोलीत 3 दिवसांपासून नळ कोरडे! जनतेत संताप; पाण्यासाठी गृहिणींवर अश्रू गाळण्याची पाळी

दुचाकी चोरट्याला एका वर्षाची शिक्षा

दुचाकी चोरल्याच्या आरोपावरून मडगाव न्यायालयाने माडीकट्टो-कुंकळ्‍ळी परिसरातील ज्योशुआ गायकवाड याला एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मुख्य न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांच्या न्यायालयाने मंगळवारी हा निवाडा दिला. आरोपपत्रानुसार, ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री आठच्या सुमारास वाडी-कुंकळ्ळी येथून जीए-०८-एएम-८४०१ क्रमांकाची दुचाकी लंपास केल्याचा आरोप आरोपीवर होता. आरोपी पुन्हा पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करत असल्याचे न्यायालयाच्या नजरेस आल्यानंतर न्यायालयाने त्‍याला शिक्षा ठोठावली. शिवाय ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com