Calangute: भाजपला कळंगुटमधून आघाडी देण्याचे लोबोंपुढे आव्हान! प्रचारात ‘आरजी’पुढे

Calangute: गत दोन निवडणुकांत काँग्रेसचे वर्चस्व : प्रचारात ‘आरजी’पुढे; भाऊ, भाईंकडून प्रारंभ बाकी
Michael Lobo News
Michael Lobo NewsDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर गोव्यातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने यंदाच्या लोकसभेत भाजपसह काँग्रेस पक्ष व ‘आरजी’चा कस लागेल. किनारी भाग लाभलेला कळंगुट मतदारसंघ सलग दोनवेळा लोकसभेवेळी हा काँग्रेसच्या बाजूने राहिला.

२०१४च्या निवडणुकीत तत्कालिन काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवाराहून ११५ मते जास्त मिळवली होती. त्यानंतर, २०१९मध्ये देखील काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवारापेक्षा २४५८ मते जास्त मिळवून मतदारसंघावर वर्चस्व अबाधित राखले होते.

कळंगुट विधानसभेचे लोकप्रतिनिधीत्व करणारे मायकल लोबो हे किमान यंदा भाजपाला आपल्या हक्काच्या मतदारसंघातून भाऊंना आघाडी मिळवून काँग्रेसची वर्चस्वाची मालिका खंडित करण्याचे लोबोंसमोर कडवे आव्हान आहे.

सध्या ‘आरजी’ सोडल्यास इतर पक्षाकडून या मतदारसंघात प्रचारास वेग आलेला दिसत नाही. आरजी सायलंट पद्धतीने प्रचारावर फोकस करत आहे. भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी प्रचाराला सुरवात केली असून त्यांचा कळंगुट दौरा झालेला नाही. मात्र, इतर कार्यक्रमांनिमित्त भाऊ कळंगुटमध्ये पोहचले.

तसेच काँग्रेसचे अ‍ॅड. खलपांकडून प्रचाराचा नारळ फोडणे बाकी आहे.तसेच, या मतदारसंघात काँग्रेसकडे नेतृत्वाची उणीव असली तरी काँग्रेसची व्होटबँक आहे. ही काँग्रेससाठी जमेची बाजू, तरी या मतांना एकत्र घेऊन भाजपविरुद्ध व्यूहरचना आखणारा, नेता कळंगुटमध्ये काँग्रेसकडे नाही.ही भाजपसाठी जमेची बाजू ठरू शकते.

Michael Lobo News
South Goa Loksabha: पारंपरिक मतांवर काँग्रेसचा भरवसा; दक्षिण गोव्यामध्ये वाढली चुरस

अल्पसंख्याक मतदारांत अस्वस्थता

1. कळंगुट हा कॅथोलिक बहुल मतदारसंघ. आणि मागील दोन दशके हा मतदारसंघ कॅथोलिक उमेदवारांमागेच उभा राहिल्याचे राजकीय स्थिती दर्शवते. कळंगुटमध्ये कांदोळी, पर्रा व कळंगुट अशा मिळून तीन पंचायती. या तिन्ही पंचायतीवर लोबोंचे वर्चस्व आहे. याशिवाय, कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा हे देखील भाजपाचे कार्यकर्ते. आणि माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस हे कुठल्याच पक्षात नाहीत.

2. सद्यस्थितीत त्यांची राजकीय सक्रियता शून्य आहे. आग्नेलो हे मायकल लोबोंचे राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. मध्यंतरी, आग्नेलो हे टीएमसीमध्ये गेले होते. कारण, काँग्रेसने लोबोंना प्रवेश देऊन पक्षाचे तिकिट दिले होते. मात्र लोबोंनी काँग्रेस चिन्हावर विजयी होऊन नंतर भाजपला साथ दिली. यामुळे अल्पसंख्याक मतदारांत थोडीशी अस्वस्थता व नाराजी आजही कायम आहे.

Michael Lobo News
Ramakant Khalap Interview: गोव्याचे प्रश्‍न लोकसभेत प्रखरपणे मांडायचेत; खलप यांची विशेष मुलाखत

लोबोंपुढे मंत्रिपदाचे गाजर ?

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीची मतमोजणी व स्थिती पाहिल्यास यावेळी लोबोंना कुठल्या परिस्थितीत भाजपाला कळंगुटमधून आघाडी मिळवून द्यावी लागेलच. कारण, आघाडी दिल्यास कदाचित ते पुन्हा भाजपाकडे मंत्रिपदाची मागणी करू शकतात.

त्यामुळे केंद्रात भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याची जितकी इच्छा आहे, तितकीच महत्त्वाकांक्षा लोबोंना पुन्हा मंत्री होण्याबाबत आहे. त्यामुळे आघाडी मिळवून देणे मायकल लोबोंसाठी मोठा ‘टास्क’ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com