Francisco Sardinha: चांद्रयान एका दिवसात बनले नाही; त्याचा पाया काँग्रेसने घातला...

खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे प्रतिपादन; सर्वांनी पाठिंबा दिल्यास निवडणूक लढवणार
Francisco Sardinha
Francisco SardinhaDainik Gomantak

Francisco Sardinha: चांद्रयान, मिशन मून हे एका रात्रीत बनलेले नाही. त्याचा पाया काँग्रेसने घातला आहे. त्यामुळे आजचे हे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केले.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर, सर्वांनी पाठिंबा दिला तर आणखी एक निवडणूक लढवेन, असेही ते म्हणाले.

दिव्यांगांना तीन चाकी गाड्या प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सार्दिन यांच्या निधीतून एकूण 11 दिव्यांगांना या बाईक्स प्रदान करण्या आल्या. आणखी काही बाईक्स मंजूर करता येणे शक्य आहे, त्यामुळे नागरीकांना लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी सार्दिन यांनी केली.

Francisco Sardinha
Girish Chodankar: मंत्री रोहन खंवटेंमुळे पर्वरीत जंगलराज! पर्वरी 'क्राईम कॅपिटल' बनली; न्यायाधीश, वकीलांमध्ये भीती

या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार आल्टन डिकॉस्टा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आदी उपस्थित होते.

खा. सार्दिन म्हणाले की, भाजप फक्त दोन, तीन कुटुंबांच्या भल्यासाठी काम करत आहे, सर्वसामान्यांसाठी नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सर्व समाजातील लोकांना एका छताखाली आणणारी आहे.

सर्व वस्तूंच्या किमती वाढवणाऱ्या आणि सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करण्यात व्यस्त असलेल्या भाजप सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी ही यात्रा होती. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. चांद्रयान, मिशन मून हे एका रात्रीत होऊ शकत नाही. या यशाचा पाया काँग्रेसनेच घातला आहे.

Francisco Sardinha
पर्यटनवाढीसाठी ओडिशाचे गोव्याच्या पावलावर पाऊल; समुद्रकिनाऱ्यांवर बांधणार शॅक्स, कॉटेज...

सार्दिन म्हणाले की, खरेतर जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत देखील अनेकांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता. पण केवळ पैशाच्या लोभापायी ते भाजपमध्ये गेले, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

तसेच सर्वांनी मला पाठिंबा दिल्यास मला काँग्रेसकडून आणखी एक निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com